प्रतिनिधी.
अलिबाग – जगभरामध्ये जीवघेण्या करोना विषाणूची परिस्थिती असून,जेथे नागरिक घराबाहेर पडायला घाबरत होते अशा महाड येथील तारीख गार्डन या इमारत दुर्घटनेच्या वेळी आपत्तीमध्ये सापडलेल्या व्यक्तींना नि:स्वार्थपणे माणुसकीच्या भावनेतून सहकार्य करण्यास आलेल्या बचावपथकांना, विविध संस्थांना व व्यक्तींना पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार सुरेश काशिद, तहसिलदार सतिश कदम यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
या सत्कारमूर्तींमध्ये रक्षा सामाजिक विकास मंडळाचे प्रतिनिधी म्हणून श्री.अमित गुरव, सुमित गुरव यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काजळपुरा येथील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या वेळी सामाजिक व भावनिक जबाबदारी ओळखून कर्जत येथील आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा क्षेत्रात कार्य करणारे, ‘रक्षा सामाजिक विकास मंडळाचे’ 5 जवान तातडीने शोध व बचावकार्यासाठी कर्जतवरून महाडला रवाना झाले होते. याबद्दल कर्जत तालुक्याचे निवासी नायब तहसिलदार श्री.राठोड यांनी या दुर्घटनेबद्दल या संस्थेला माहिती दिली हाेती व तातडीने मदत व बचावकार्यासाठी महाडकडे रवाना होण्यास सांगितले हाेते. दरम्यान हा प्रवास चालू असताना कर्जत तालुक्याचे नायब तहसिलदार श्री. भालेराव यांनी श्री. अमित गुरव यांना महाडचे तहसिलदार व नायब तहसिलदार यांचे संपर्क क्रमांक देऊन त्यांच्या संपर्कात राहायला सांगितले.
महाड येथील दुर्घटना ही अतिशय दुर्दैवी घटना होती. दि. 24 ऑगस्ट च्या मध्यरात्री, रक्षा सामाजिक विकास मंडळाचे ज्येष्ठ गिर्यारोहक श्री.अमित हरि गुरव यांच्या नेतृत्वाखाली शोध आणि बचावकार्याची टीम महाडमध्ये पोहोचली आणि रात्रीतूनच त्यांनी शोध व बचावकार्याला तातडीने सुरुवात केली. या शोध आणि बचाव पथकामध्ये कर्जत येथील अक्षय गुप्ता, प्रखर गुप्ता, प्रसाद गिरी व सुमित गुरव यांचा समावेश होता. महाड इमारत दुर्घटनेच्या वेळी बचावकार्याबद्दल अनुभव कथन करताना श्री.गुरव यांनी सांगितले की, त्या घटनास्थळी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पोलीस, विविध बचाव पथके, सामाजिक कार्यकर्ते, जेसीबी, पोकलेन व डंपर पोहोचले होते. काही कालावधीनंतर त्यांनी अपघातग्रस्त ठरलेल्या बिल्डिंगचा मलबा बाहेर काढण्यासाठी जेसीबी व पोकलेन यांना मदतकार्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी जेसीबी/ पोकलेन ड्रायव्हर यांना मार्गदर्शन करणे, योग्य त्या ठिकाणी खणण्यासाठी दिशा दाखविणे, जेसीबी द्वारे खणत असताना समोरच्या मलब्यामध्ये तेथे इमारत पडण्यापूर्वी तेथे राहणाऱ्या व्यक्तींच्या मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे, दागदागिने आढळल्यास प्रशासनाच्या हवाली करणे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे शोधकार्य करीत असताना वेळोवेळी जेसीबी व पोकलेन चे कार्य थांबून मलब्यामधील मोकळ्या जागेमध्ये आवाज देऊन त्या ढिगाऱ्याखाली अडकलेली व्यक्ती प्रतिसाद देतेय का? हे पाहणे, इत्यादी महत्वाची कामे केली. या सर्व बचावपथकांना व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या च्या टीमला जवळजवळ 18 तासानंतर म्हणजे दि.25 ऑगस्टला फार मोठे यश मिळाले, ते म्हणजे एक लहान मुलगा व काही वेळेनंतर 62 वर्षाची महिला यांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. कित्येक तास, नि:स्वार्थीपणे या सर्व बचतपथकांतर्फे शोध व बचावकार्य करण्यात येत होते.
या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक अनुकूल गोष्ट अशी होती की, पावसाने थोडी उसंत घेतली होती. त्यामुळे जेसीबी, पोकलेन आणि इतर गोष्टींच्या साहाय्याने शोध आणि बचाव कार्याला उत्तम वेग मिळत होता. हे शोधकार्य दिवसरात्र चालू असताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, इतर सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी स्थानिक अधिकारी-कर्मचारी हे जातीने दुर्घटनास्थळी हजर होते.
Related Posts
-
ई-ऊसतोड कल्याण’ ॲपचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण
बीड/प्रतिनीधी - ऊसतोड कामगार ऊसतोडणीसाठी कारखान्यांवर जाण्यासाठी निघण्यापूर्वीच ऊसतोड कामगारांची…
-
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी. मुंबई - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील…
-
डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांच्या पुस्तिकेचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. गडहिंग्लज/प्रतिनिधी - ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ…
-
महाराष्ट्रातील तिघांना जीवन रक्षा पदक जाहीर,देशातील ५९ व्यक्तींना जीवन रक्षा पदक
प्रतिनिधी. नवी दिल्ली - दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दैनंदिन जीवनात जनतेच्या संरक्षणासाठी…
-
राज्यात कौशल्य विकास रथाद्वारे जनजागृती, कौशल्य विकास आणि रोजगाराची माहिती देणार
मुंबई प्रतिनिधी - केंद्र आणि राज्य शासनामार्फत कौशल्य विकासासाठी कोणकोणते…
-
क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त…
-
कल्याण उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत…
-
केडीएमसीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेल्या वर्षभरापासून बेकायदा बांधकामाबाबत लोकशाही…
-
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर कल्याणात राष्ट्रवादीची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे…
-
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास…
-
लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी ठरतोय डोकेदुखी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत असून सिग्नल…
-
रेल विकास निगम लिमिटेडला नवरत्न दर्जा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रातिनिधी - रेल्वे विभागाची सार्वजनिक…
-
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - धनगर समाजाला…
-
बार्टीमार्फत १८ ते २० मे रोजी कौशल्य विकास व उद्योजकता विकास या विषयावर ऑनलाईन वेबिनार
मुंबई/ प्रतिनिधी - महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रशिक्षित करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन…
-
वायलेनगर मध्ये विकास कामाचे आमदारांच्या हस्ते पूजन
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील वायलेनगर मध्ये चौकांना नवी…
-
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी
मुंबई/प्रतिनिधी – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी…
-
कल्याण येथील लोकन्यायालयात १९५१ प्रकरणे निकाली
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शनिवारी कल्याण तालुका विधी सेवा समितीतर्फे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे…
-
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये इंडियन ऑटो शो
मुंबई प्रतिनिधी - पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई/ प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
खा. हेमंत पाटील यांच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय…
-
आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक संदेश देत भव्य रॅलीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब…
-
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये फेरबदल
मुंबई/प्रतिनिधी - भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका मंजूर सुधारित विकास आराखड्यामधील खेळाच्या…
-
रक्षा मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव : इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग : ३७ शैक्षणिक…
-
कल्याण मध्ये नाना पटोले यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/p6VcYFNbPkE कल्याण- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
-
अमरावतीच्या युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांच्या विरोधात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - युवा स्वाभिमान…
-
कल्याण मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते…
-
युवासेनेकडून आमदार शिरसाठ यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे प्रतिनिधी - शिवसेना ठाकरे गटाच्या…
-
विनोदी साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - दिनांक 12 जून हा…
-
'प्रबुद्ध भारत' दिनदर्शिकेचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…
-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आता नवीन लोगो
मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) नवीन…
-
महाराष्ट्रातील तीन पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पोलीस सेवेत अदम्य…
-
खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटातील शिवसैनिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रात…
-
सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भिवंडी (Bhiwandi) लोकसभा…
-
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या पत्रकरांसंदर्भातील व्यक्तव्यावर राष्ट्रवादीचे टिकास्त्र
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी…
-
उंबर्डे येथील रस्ता रुंदीकरणातील ७० बांधकामावर केडीएमसीचा हातोडा
कल्याण : कल्याण पश्चिमेतील कै. आत्माराम भोईर चौक (तलाठीऑफिस) ते नेटक-या…
-
पहलवान साहेब जीवन चरित्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्कसपटू मल्ल…
-
दिवा रेल्वे क्रॉसिंगवर पूल बांधण्यास मान्यता विकास आराखड्यात फेरबदल
मुंबई प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते किशोर दिवाळी अंकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन…
-
वंचित बहुजन आघाडीचा महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
नव मतदारांचे गुलाब पुष्प देवून सामाजिक कार्यकर्त्यांनी केले स्वागत
NATION NEWS MARATHI ONLINE. धुळे/प्रतिनिधी - धुळे शहरातील देवपूर भागात…