नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी – संध्या केंद्रात व राज्यात महायुतीकडून जनतेला विविध प्रकारे आमिष दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असले तरी जनतेच्या आता यांचा भूलभूलैयांचा प्रकार लक्ष्यात आला असून येणार्या लोकसभेत महाविकास आघाडीला शिर्डी , नगरसह ४० पेक्षा जास्त जागा निश्चित मिळणार असून राज्यात शिर्डीसह २२ ते २३ जागा काँग्रेस पक्ष लढविणार तर शिर्डी लोकसभातर्गत काँग्रेस पक्षाचे मोठे संघटन असल्याने या जागेकरिता दावा करत पक्ष आग्रही रहाणार तर हायकमांडने संधी दिल्यास शिर्डीतून निवडणुक लढू अशी माहिती काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी तथा प्रवक्ता डॉ राजू वाघमारे यांनी दिला.
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी बु येथे खाजगी कार्यक्रम व भेटी प्रसंगी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ राजू वाघमारे बोलत होते . याप्रसंगी आश्वी बु चे लोकनियुक्त संरपच नामदेव शिंदे , रिपाई ( गवई ) किशोर वाघमारे , ग्रा प सदस्य बबनराव शिंदे , अमोल राखपसरे आदीसह गामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.