नेशन न्यूज मराठी टीम.
कोल्हापूर/प्रतिनिधी – इचलकरंजी शहरामध्ये आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी 72 तासाचे अन्नत्याग व आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. मणिपूर येथे झालेले घटनेच्या निषेधार्थ तसेच दिल्ली येथे महिला कुस्तीपटूना झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज राजू शेट्टी यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र लिहून झालेले घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. मणिपूर सरकार बरखास्त करावे अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती यांच्याकडे मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 72 दिवसांनी बोलतात हे देशासाठी लाजिरवानी गोष्ट आहे हे केंद्र सरकारने व तेथील राज्य सरकारने दोषींवर कडक कारवाई करावी तसेच संविधान वाचण्यासाठी व जनतेची माफी मागण्यासाठी हे आंदोलन आम्ही सुरू केले आ.हे या आंदोलनाला माजी खासदार राजू शेट्टी, विश्वास बालीघाटे महंमद हुसेन मुजावर पुरंदर पाटील, राजू निर्मळे विकास चौगुले आदीजण उपस्थित होते.