Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
कृषी ताज्या घडामोडी

वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने केळी पीक भुईसपाट

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

अकोला/प्रतिनिधी – वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने अकोला जिल्हयातील अनेक गावांना झोडपले आहे. या अवकाळी पावसामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. अकोला जिल्हयात रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासह गारपिट झाली. धामणगाव आणि पणज येथील शेत शिवारात केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला केळी उत्पादक शेतकरी काल झालेल्या पावसामुळे आस्मानी संकटाला सामोरे जात आहे.

गारपिटीमुळे तोडणीला आलेल्या केळी पिकाला जबर मार बसला. पावसासह आलेल्या वादळी वाऱ्याने केळीची झाडे जमिनीवर कोसळले. तर काही भागात केळी पिक भुईसपाट झाले असून, पणज भागात गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा तिसऱ्यांदा केळी पिकाला तडाका बसला आहे. दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Translate »
X