नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – गाडी पार्किंग वरून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे- गुरुवारी संध्याकाळी टिटवाळा भूषण मोरे या होमगार्डने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमया गॅलक्सी मध्ये राहणाऱ्या होमगार्ड भूषण मोरे येथे टिटवाळा स्टेशन जवळच रेल्वे ट्रॅक वर लोकल खाली झोकून आत्महत्या केली आहे. भूषणच्या मृतदेह जवळ रेल्वे पोलिसांना सुसाईड नोट मिळाली. त्या नोटवरुन त्याला मानसिक त्रास दिल्याने त्याने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे लिहिले होते.
भूषण मोरे हा होमगार्ड म्हणून ठाणे रेल्वे पोलीस मध्ये कार्यरत होते. भूषण मोरे राहत असलेल्या इमारतीमध्ये त्याचे पार्किंग वरून चार जणांसोबत वाद झाले होते. या वादामुळे भूषण मानसिक तणावात होता. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर लोकल खाली झोकुन देत भूषण मोरे यांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुसाईड नोट नुसार याप्रकरणी रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.