DESK MARATHI NEWS ONLINE.
मुंबई/प्रतिनिधी – लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रवशांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. कारण मध्य रेल्वेवर ठाणे स्थानकात विशेष मेगा ब्लॉक तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर 36 तासांचा विशेष ब्लॉक असणार आहे. 63 तासांच्या विशेष ब्लॉक दरम्यान ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाच आणि सहा च्या रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. ठाणे स्थानकात डाऊन फास्ट मार्गावर 63 तासांचा विशेष ब्लॉक असेल. ३० ते ३१ मे च्या मध्यरात्री १२.३० पासून २ जून दुपारी ३.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या विशेष ब्लॉक दरम्यान कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन मध्य रेल्वेचे केले आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील 36 तासांच्या विशेष ब्लॉक दरम्यान फलाट क्रमांक 10 आणि 11 वर २४ डब्यांच्या गाड्या थांबवण्याच्या अनुषंगाने फलाटाची लांबी वाढवली जाणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातील 36 तासांचा ब्लॉक ३१ मे ते १ जूनच्या मध्यरात्री १२.३० वाजता सुरू होणार जो २ जून दुपारी १२.३० पर्यंत असणार आहे. या दरम्यान ९३० लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. यात ४४४ रेल्वे शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार तर ४४६ रेल्वे शॉर्ट ओरिजिनेट करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच विशेष ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवास टाळणे तसेच अत्यावश्यक असल्यास प्रवास करण्याचा सल्ला रेल्वे प्रवाशांना देण्यात आला आहे.