प्रतिनिधी रायगड -आज सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास गेट वे ते मांडवा जेट्टी या दरम्यान चालणारी अजंठा प्रवासी बोट ८८ प्रवाशी घेऊन मांडवा जेट्टीपासून काही किलोमीटर अंतरावर असताना अचानक बुडू लागल्याने बोटीवरील प्रवास करणारे पुरुष, महिला व लहान मुले यांनी घाबरून आरडाओरड चालू केला असता सागरी गस्तीवर निघालेल्या रायगड जिल्हा पोलीस दलातील सद्गुरू कृपा बोटी वरील नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी पो. ना बक्कल न. ८९१ श्री प्रशांत घरत यांनी ट्रॉलर वरील तांडेल व खलाशी यांचे मदतीने बुडणाऱ्या प्रवाशी बोटींजवळ त्वरित पोहचून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता अत्यन्त सावधगिरीने त्यावरील ८८ पुरुष, महिला व बालके यांचा जीव वाचवून त्यांना पोलीस गस्तीवरील नौकेच्या सहाय्याने जेट्टीवर सुखरूप आणले.
सदर दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसुन सुटका झालेल्या सर्व प्रवाशी यांनी व पोलीस अधीक्षक रायगड यांनी पोलीस कर्मचारी घरत यांची कार्यतत्परता, निर्णय क्षमता व धाडसाचे कौतुक केले आहे. आज प्रशांत घरत याच्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सर्व प्रवाशांना मदत केली. तर बोट काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. अजंठा या बोटसेवा देणाऱ्या कंपनीवर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे धर्मराज सोनके यांनी सांगितले.
बोटीची क्षमता ५०ते ६० प्रवाशांची असतानाही जास्त प्रवाशी कसे बोटीत घेतले गेले.याची चौकशी होणे महत्वाचे आहे.बोट सेवा देणाऱ्या कंपन्या प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचं आजच्या घटनेत दिसून आलं आहे. तरी सरकारने योग्य ती कारवाई करून लक्ष देण्याची गरज आहे.
Related Posts
-
कार्यकर्त्यांचा जल्लोष, पण रुग्णवाहिकेतील चिमुकल्यांचा जीव टांगणीला
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - कृषी उत्पन्न बाजार समितीची…
-
डिझेलची तस्करी करणारी बोट तटरक्षक दलाने केली जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय तटरक्षक…
-
भारतीय तटरक्षक दलाने केरळातून सहा भारतीयांसह इराणची बोट घेतली ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय तटरक्षक…
-
मुंबईत फॉर्म्युला- १ पॉवर बोट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा २०२२ चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबईत फॉर्म्युला 1 (F 1…
-
आपण चंद्रावर पोहोचलो पण रोजच्या जातीय द्वेषाचे, जातीवादाचे काय? प्रकाश आंबेडकरांचा सवाल !
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - भारतीय अंतराळ…
-
एकटे किंवा सगळे मिळून लढुया पण, लढण्याची तयारी ठेवा - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्युज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत जोडो न्याय…
-
जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, पण पाळावे लागणार काटेकोर नियम
प्रतिनिधी. अलिबाग- कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव व संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक…
-
डोंबिवली कोळेगावातील हृदयद्रावक घटना, आई व बहिणीला वाचवण्यास गेलेली १६ वर्षीय मुलगी खदाणीत बुडाली
प्रतिनिधी. डोंबिवली -डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात दुपारच्या सुमारास गीता शेट्टी आपल्या…
-
निषेध मान्य पण बंद नको,शिवाजी महाराजाच्या बद्दलच्या वक्तव्यावर भूमिका का घेतली गेली नाही - आ. राजू पाटील
नेशन न्यूज़ मराठी टीम. https://youtu.be/ylODXWIO8Pg डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - उद्धव ठाकरे…