नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर/प्रतिनिधी – गांधी परिवाराला बेघर करण्याची शिक्षा कर्नाटकाच्या जनतेने भाजपला दिली असल्याचे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. नाना पटोले हे जालनामार्गे विदर्भात जात असताना ते जालना येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
देशातली लोकशाही संपवण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे हे बदलाचे वारे असून राहुल गांधींचे नेतृत्वावर शिक्कमोर्तब करण्याचं काम कर्नाटक मधून सुरु झाल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. तर अनपढ व्यवस्था देशातील सत्तेत बसलेली असून भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
भाजपाने धडा शिकला पाहिजे की सत्तेचा दुरुपयोग करुन जनता घाबरणार नाही नाना पटोले यांनी भाजपला टोला लगावला. मागच्या वर्षी सुद्वा आम्हाला काठावर बहुमत दिलं होतं. भाजपचा खरा चेहरा भ्रष्टाचारी भाजप हे जनतेच्या समोर आलं.लिंगायत समाजाच्या जोरावर निवडून आले आणि त्यांना वाळीत टाकण्याचे काम भाजपने केले. त्यामुळे त्यांना तिथल्या जनतेने वाळीत टाकले कर्नाटकात 124 च्या वर जागा सुशिक्षित मतदारांनी कॉंग्रेसला दिल्या आहेत याहूनही जास्त जागा येतील असे म्हणत भाजप वर पाटोळे यांनी निशाना साधला.
राहुल गांधीवर खोटा आरोप लावून त्यांच लोकसभेच सदस्यत्व रद्द करण्याचं पाप भाजपने केल त्यांना बेघर केलंराहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानण्याची देशात सुरुवात झाली आहे राहुल गांधीकडे आम्ही पंतप्रधान म्हणून पाहतोय, राहुल गांधी शिकलेले आहेत आताचे पंतप्रधान किती शिकले मला माहित नाही असेम्हंत पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकाही केली
जो कोणी भाजपाविरोधात ताकदीने लढायला तयार आहे त्यांना आम्ही सोबत घेऊ कॉंग्रेससाठी सत्ता दुय्यम विषय आहे, आधी देश आणि संविधान आहेभाजपसाठी सत्ता प्रथम आहे उद्या कॉंग्रेसच सरकार आल तर भ्रष्टाचार संपवायला वेळ लागणार नाही, कारण सर्व भ्रष्टाचारी भाजपमध्ये आहेत, पिंजऱ्यात अडकले आहेत असे टीकास्त्र नाना पटोले यांनी भाजप वर सोडले.