नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नंदुरबार/प्रतिनिधी – राहुल गांधी यांची न्याययात्रा येत्या 12 फेब्रुवारी ला नंदुरबार जिल्हात येणार आहे. त्यानिमित्त जाहीर सभेचे आयोजन नंदुरबार येथे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त आज माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला काँग्रेसचे माजी मंत्री आमदार के सी पाडवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हा जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी होणारा सभेच्या जागेची पाहणी केली.
नंदुरबार जिल्ह्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. काँग्रेस व गांधी कुटुंब यांनी नंदुरबार जिल्ह्याला नेहमी महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. भारतातील महत्त्वाचे ठिकाण कोणते असेल तर ते नंदुरबार जिल्हा आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या सभा येथे झाल्या असून आता राहुल गांधी यांची या जिल्ह्यात सभा होणार आहे. जिल्ह्यातील मतदारांनी नेहमीच काँग्रेसला पाठींबा दिला आहे. ही न्याय यात्रा काढण्याचे उद्देश असे आहे की देशापुढे अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहे. आताची सरकार राज्यघटना पायदळी तुडवत आहे. देशात महागाई , बेरोजगारी ,गरिबी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वसामान्याचे जगणं आता महाग झाले आहे म्हणून या न्यायात्रेमुळे देशाच्या नागरिकांना एकत्र करण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. न्याययात्रे निमित्त देशात राहुल गांधी फिरत आहे, परंतु लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी नंदुरबारला येत असून महाराष्ट्राची जाहीर सभेची सुरुवात नंदुरबार पासून होत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात जागा वाटपात च्या प्रश्न हा सुटला असून फक्त चार ते पाच जागा बाबतच प्रश्न उद्भवला आहे. परंतु यावर बैठका व चर्चासत्र सुरू असून भाजपाच्या कार्यसरणी ज्या पक्षांना आवडत नाही त्या पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे देखील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.