नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – इंडिया आघाडीची महत्वपूर्ण बैठक मुंबईत येत्या दोन दिवसांत पार पडणारआहे.कॉग्रेसचे माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी ह्या बैठकीचा आढावा देत माध्यमांना माहिती देताना म्हटले कि,इंडिया मिटची तयारी आता पूर्ण झाली आहे.
देशातील काही प्रमुख नेते मुंबईत यायला सुरुवात झाली आहे. लालूप्रसाद यादव आणि ममता बॅनर्जी मुंबईत दाखील झाले आहेत. के सी वेणुगोपाल आणि फारुख अब्दुल्ला आले आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि एम. के. स्टॅलिन हे देखील दाखल होतील.जवळपास 28 पक्षांचे सर्व प्रमुख नेते या बैठकीला दाखल होतील.
सुरुवातीला अंतर्गत अनौपचारिक चर्चा होईल. चर्चेमध्ये बैठकीचे कशाप्रकारे आयोजन असणार आहे त्याच्या तयारीची चर्चा पूर्णपणे होईल. सकाळी १०:३० ला बैठकीचा प्रारंभ होणार अशा प्रकारचा नियोजन करण्यात आला आहे. विरोधकांनी केवळ प्रसिद्धीसाठी त्याच वेळी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
देशातील राजकीय नेतृत्वाबाबत बोलताना ते म्हणाले कि, राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करणारं तरुण नेतृत्व आहे. तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहेत.