नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT), ‘फ्लक्स कोअर्ड सोल्डर वायर’ साठी नवीन गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCO) अधिसूचित केला, जो ई-राजपत्रातील अधिसूचनेच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर लागू होईल.
फ्लक्स कोअर्ड सोल्डर वायर (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2023 मध्ये वायरच्या मध्यभागी फ्लक्स असलेल्या विशिष्ट प्रकारच्या सोल्डर वायरचा समावेश आहे. फ्लक्सशिवाय, वायर सोल्डर वापरणे कठीण होईल. हे इलेक्ट्रॉनिक घटक, ऑटोमोबाईल्स, दूरसंचार आणि विविध अभियांत्रिकी उद्योगांमध्ये सोल्डरिंग करण्यासाठी वापरले जाते.
सोल्डरिंग प्रक्रिया, जरी सोपी वाटत असली तरी, ही एक गंभीर प्रक्रिया आहे, जिथे फ्लक्स कोअर्ड सोल्डर वायरची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची असते कारण कोणत्याही बिघाडामुळे विशेषतः इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोबाईल उद्योगात सोल्डर केलेल्या उत्पादनांच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर परिणाम होतो. या उत्पादनासाठीच्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाची अंमलबजावणी केवळ ग्राहकांच्या सुरक्षेसाठीच नाही तर देशातील उत्पादन गुणवत्ता मानकांमध्ये सुधारणा करेल आणि भारतातील उप-मानक उत्पादनांच्या आयातीला आळा घालेल.
देशांतर्गत लघु/ सूक्ष्म उद्योगांचे रक्षण करण्यासाठी तसेच व्यवसाय सुलभीकरणासाठी गुणवत्ता नियंत्रण आदेशाची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने लघु/ सूक्ष्म उद्योगांना वेळेच्या संदर्भात शिथिलता देण्यात आली आहे. लहान उद्योगांसाठी अतिरिक्त तीन महिने तर सूक्ष्म उद्योगांसाठी अतिरिक्त सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. विकास गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळा, उत्पादन पुस्तिका इ. हे उपक्रम भारतातील गुणवत्तापूर्ण परिसंस्था विकसित करण्यात मदत करतील. उपरोक्त उपक्रमांद्वारे, भारतामध्ये उच्च दर्जाची जागतिक स्तरीय उत्पादने विकसित करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “आत्मनिर्भर भारत” निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण होईल.