नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रर्तीनिधी – सुधारणांना चालना देण्यासाठी आणि व्यवसायात सुलभता आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत संरक्षण उत्पादन विभागाने निर्यातीसाठी असलेल्या विक्री केंद्रांसाठी गुणवत्ता हमी संस्थांकडून आकारले जाणारे गुणवत्ता हमी शुल्क आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखाली माफ केले आहे.हा उद्योग स्नेही उपक्रम संरक्षण उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक बनवेल.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय संरक्षण उत्पादने अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालय उद्योगांना त्यांच्या उत्पादनांमध्ये काही दोष असल्यास ते सुधारण्यासाठी विविध चाचणी आस्थापनांद्वारे चाचणी सुविधा पुरवते. गुणवत्ता हमी संस्थांकडून एका ठराविक दराने शुल्क आकारले जाते आणि उद्योग हे शुल्क उत्पादनांच्या किंमतीमध्ये जोडते , त्यामुळे त्याच्या किंमतीच्या स्पर्धात्मकतेवर प्रतिकूल परिणाम होतो. मात्र आता हे शुल्क रद्द करण्यात आले आहे.