नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दिनांक ०३ मार्च २०२४ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ० ते ५ वर्षे वयाखालील सुमारे १,६६,१७० बालकांना १३२० लसीकरण केंद्रांमार्फत मोफत पोलिओची लस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच दिनांक दि. ०३ मार्च २०२४ रोजी जी बालके बुथवर पोलिओचा डोस घेण्यासाठी येऊ शकणार नाही त्यांना पुढील ५ दिवसात त्यांच्या घरोघरी जाऊन लस पाजण्यांत येईल. त्यासाठी एकूण ७१६ लसीकरण चमू असतील. मागील वेळेस १० डिसेंबर २०२३ दरम्यान पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत १,७४,०८५ बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली आहे.
तरी सर्व सुजाण पालकांना या निवेदनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सक्रीय सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचा स्वानंद मिळवून संपूर्ण जगातून पोलिओ उच्चाटन करण्यात सिंहाचा वाटा उचलून आपल्या बालकांचे संरक्षण करावे.