नेशन न्यूज मराठी टीम.
अकोला/प्रतिनिधी – जय भवानी मित्र मंडळ, हरिहरपेठ, अकोला यांच्या २१०० भरण्यांची कावड यात्रा उज्जैन ते अकोलाचे आयोजक पै. राजेश चव्हाण, पै. आकाश शिरसाट, गोपाल प्रकाशराव राऊत, किशोर वानखडे, पै. आशु वानखडे, बालमुकुंद भिरड, अॅड. संतोष राहाटे यांच्या वतीने श्री राजराजेश्वर नगरीतील अकोला शहरातील येणाऱ्या भव्य कावड महोत्सव सहभागी पालखीचे अध्यक्ष यांना टोपी, दुपट्टा, श्रीफळ देऊन सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते. अकोला जिल्हयाचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर, पालखीचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांचा सत्कार वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते व गोपाल प्रकाशराव राऊत यांच्या हस्ते श्री राजराजेश्वर पालखीचे पुजन करण्यात आले. त्यानंतर येणान्या सहभागी प्रत्येक पालखीचे पुजन व पालखी अध्यक्षाचे स्वागत व सत्कार गोपाल प्रकाशराव राऊत, बालमुकुंद भिरड, अॅड. संतोष राहाटे, मनोहर पंजवानी, किशोर सेठ वानखडे, अमोल कलोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, जि. प. उपाध्यक्ष सुनील फाटकर, जि. प. समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, निलेश देव, जि. प. सदस्य सुशांत बोर्डे, जि.प. सदस्य राम गव्हाणकर, जि.प. सदस्या निताताई गवई, जि.प. सदस्य शंकरराव इंगळे, विकास सदांशिव, प्रा. सुरेश पाटकर, अशोक शिरसाट, अमोल कलोरे, चरण इंगळे, किशोर जामनिक, गोपाल चव्हाण, सरपंच गट ग्रा.पं.उमरदरी, गोपाल ढोरे, संदिप पंजवानी, पुरुषोत्तम अहिर, बबलु शिरसाट, नितेश किर्तक, पराग गवई, डॉ. अशोक गाडगे, सुनिल सरदार, संजय सोनोने, इ. मान्यवर उपस्थित होते.