महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी मुंबई

कँन्सर पिडीतांमध्ये आत्मविश्वास जागविणारे “संध्या” या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई प्रतिनिधी – आदर्श आई, पत्नी आणि परिचारिका या भूमिका एकत्र पेलतांना संध्या पाडावे यांना कँन्सर सारख्या दुर्धर रोगाने गाठले.पण शेवटच्या श्वासापर्यंत त्या या रोगाचा धैर्याने सामना करीत राहिल्या.त्या आठवणी जागविणारे “संध्या” हे पुस्तक कँन्सर पिडीत रुग्णांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करणारे ठरेल,असे उदगार ज्येष्ठ पत्रकार,प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर यांनी येथे या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी काढले.
मुंबई राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्यालयीन सचिव नितिन पाडावे यांच्या पत्नी परिचारिका सौ.संध्या यांचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले.लोकसेवेतील कर्तव्याला जागतांना सौ.संध्या पाडावे यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडल्या.या आठवणींचा धांडोळा घेणारे आणि असंख्य कँन्सर पिडीतांमध्ये आत्मविश्वास जागविणारे “संध्या” हे पुस्तक लिहिले त्याचा प्रकाशन सोहळा रविवारी घाटकोपर पूर्व येथील गुरुकृपा हॉटेल सभागृहात पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या हस्ते पार पाडला.

कार्यक्रमाला ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल, राष्ट्रवादीच्या नगरसेविका राखी जाधव,डॉ.उज्वला बारापत्रे, डॉ.शुषमा सारुकटे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रकाशक हिंदुराव जाधव,आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.त्या वेळी बोलतांना पत्रकार सुकृत खांडेकर पुढे म्हणाले, पत्नीच्या मृत्यू नंतर तिच्या यातना नितीन पाडावे यांनी डोळ्यातून पाणी न काढता पुस्तक रुपाने लिहिल्या आहेत,त्या निश्चितच थक्क करणाऱ्या आहेत. पुस्तकातील आठवण जागविताना खांडेकर म्हणाले, संध्याला पती कडूनची सेवा न पाहावल्याने सतत वाईट वाटत असते व ते दुःख ती पतीकडे व्यक्त करते त्यावेळी पती म्हणतो हीच बाधा मला झाली असती तर तूही माझी अशीच सेवा केली असतीस ना? असे अनेक भावनोत्कंठ प्रसंग पुस्तकात चित्रित करण्यात आले आहेत,त्या मुळे हे पुस्तक सर्वांना आवडेल.
ज्येष्ठ कथा लेखक काशिनाथ माटल म्हणाले,मृत्यू दारात उभा राहिला असतांना, जगायचे कसे?याचा वस्तूपाठ देणारे हे पुस्तक आहे.मृत्यूचे भय आपण आताच कोरोना महामारीत अनुभवले आहे.नगरसेविका राखी जाधव म्हणाल्या,पती-पत्नीच्या निस्सीम प्रेमाने भारलेले हे पुस्तक व्हँलेटाइन डे साजरा करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालुन जाईल.
डॉ.श्रीमती उज्वला बारापात्रे, डॉ.सुषमा सारुकटे यांनी आपल्या भाषणात संध्या पाडावे यांच्या वैद्यकीय सेवेतील निरामयी आठवणी जीवंत केल्या.
पुस्तकाचे लेखक नितीन पाडावे म्हणाले,मी लिहिलेलं केवळ पुस्तक नसून ते वास्तव आहे. कमी पगार घेणाऱ्या पतीशी विवाह करुन यशस्वी संसार कसा करता येतो,हे या पुस्तकात पहायला मिळेल.या पुस्तकाचे आर्थिक उत्पन्न आपण कँन्सर पिडीतांच्या सहाय्यासाठी देणार आहोत,असेही नितीन पाडावे म्हणाले.

Related Posts
Translate »