नेशन न्यूज मराठी टीम.
बारामती / प्रतिनिधी – मणिपूर मध्ये घडलेल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्वतर्फे बारामती प्रांत कार्यालयावरती निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष राज कुमार म्हणाले अस्वस्थ मणिपूर आहे कि अस्वस्थ भारत आहे? मणिपूर धगधगतंय कि संपूर्ण भारत धगधगतोय? मणिपूर हादरलय कि संपूर्ण भारतीय समाजच हादरला आहे? विटंबना दोन स्त्रियांची झाली कि भारतातील संपूर्ण स्त्री जातीची झाली? विवस्त्र धिंड दोन स्त्रियांची निघाली, कि हजारो वर्षांचा इतिहास असणा-या भारतीय संस्कृतीची निघाली?
मणिपूर सारख्या सीमेवरील अतिसंवेदनशील राज्यात गेली अडीच ते तीन महिने दोन जातीमध्ये प्रचंड जीवघेणा संघर्ष सुरु आहे. उघडकीस आलेल्या दोन स्त्रियांच्या विटंबनेमुळे अगोदरच संवेदनशील असणारे भारतीय समाजमन पूर्णतः हादरुन गेलं आहे. त्यामुळं ही दोन स्त्रियांची विटंबना नसून जगासमोर भारताला नग्न करून भारताची इज्जत काढली अशा नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी असे मत राज कुमार यांनी व्यक्त केले.
भारतासारख्या देशांमध्ये स्त्रियांवरती अत्याचार केला जातो. याच्यासारखी निंदनीय गोष्ट कोणतीच नसून मणिपूर घटनेची दखल घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागावी असे मत महिला जिल्हा अध्यक्षा सीमाताई भालेसाईन यांनी व्यक्त केले. मणिपूर येथे तीन महिन्यापासून संघर्ष चालू असून महिलांची नग्न धिंड काढून देखील प्रशासनाने केसेस केल्या नाहीत त्यामुळे तेथील पोलीस प्रशासनाला देखील जबाबदार धरून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावेत असे मत महासचिव मंगलदास निकाळजे यांनी व्यक्त केले. त्यांच्यासोबत या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते,