महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

कल्याणात १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण शहरात १० मे ऐवजी १५ मे रोजी भव्य जाहीर सभा होणार आहे. भिवंडी व कल्याण लोकसभा क्षेत्रासाठी होणाऱ्या या सभेला दोन्ही लोकसभा क्षेत्रातील महायुतीच्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महायुतीचे भिवंडीतील उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण येथे १० मे रोजी सभा होणार होती. मात्र, या सभेच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार कल्याण पश्चिम येथील वर्टेक्स कॉम्प्लेक्सशेजारील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भव्य व विक्रमी सभा होईल. या सभेला लाखो नागरिकांची उपस्थिती राहतील, अशी माहिती महायुतीचे भिवंडीतील उमेदवार कपिल पाटील यांनी दिली आहे.

Translate »
×