नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर हे आरक्षणसाठी असलेल्या लढाईला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या आरक्षणात मराठा समाजचा समावेश करण्यासाठी सरकार विचार करत आहे हे समजताच ओबीसी समाज बांधव देखील आक्रमक झाले आहेत. आपल्या ओबीसी आरक्षणाचा टक्का कमी न करता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. अशी मागणी ठाणे येथील ओबीसी समाजाने देखील केली आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहे. तसेच राज्यात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, या मागणीसाठी ओबीसी जनमोर्चाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत घोषणाबाजी केली .