नेशन न्यूज़ मराठी टिम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – सायबर गुन्हे टाळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून जनजागृती मोहिमेंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाला बॉलीवूड अभिनेत्री पुजा हेगडे उपस्थित होती. शहरातील वाढते सायबर गुन्हे कमी करण्यासाठी, नवी मुंबई पोलिसांनी सायबर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
सिडको नवी मुंबई येथे सायबर सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. या वेळी सायबर गुन्हे करून लोक इतरांच्या पैशांची उधळपट्टी कशी करतात आणि ते कसे टाळता येईल, याची माहिती देण्यात आली. एटीएम फसवणूक, केव्हीएस फसवणूक, लॉटरी फसवणूक याविषयी लोकांना माहिती देण्यात आली. व त्यांना असा कोणताही फोन आला तर त्याला फोनवर उत्तर देऊ नका, तर थेट त्यांच्या शाखेत जा किंवा कोणतेही कागदपत्र असतील ती समोरासमोर हाताळा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले.