महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे लोकप्रिय बातम्या

प्रभात फेरीच्या माध्यमातून मतदान जनजागृती मोहिम

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा निवडणूक 2024 ची सुरुवात काही दिवसांतच होईल पण त्या आधी मतदान जनजागृतीसाठी स्विप अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. कारण बरेच नागरिक मतदान करायला कंटाळा करतात,काहींच्या मनात मतदानाविषयी बरेच संभ्रम असतात,तसेच प्रत्येकाने निपक्षपाती आणि निर्भीडपणे मतदान करावे हेच स्वीप चे उद्देश्य आहे.

लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत कल्याण मधील 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात,मतदार जनजागृतीसाठी अभिनव संकल्पनांचा वापर करत विविध जनजागृतीपर स्विप कार्यक्रमांची अंमलबजावणी ठिकठिकाणी होत आहे. याच अनुषंगाने 142 कल्याण पूर्व,च्या स्विप पथकातील महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली आय प्रभागक्षेत्र कार्यालयाजवळील,नानासाहेब धर्माधिकारी उद्यान येथे सकाळी प्रभात फेरीसाठी येणाऱ्या नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले आणि त्यानंतर ‍मतदान करणेबाबत जनजागृती करण्यात आली.ध्वनिक्षेपकामार्फत मतदान जनजागृतीपर गीत वाजून लोकांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.

त्याचप्रमाणे राजेश्वरी पार्क सोसायटी, मलंग रोड येथिल सोसायटीमधील सभासद यांचे समोर मतदान जनजागृतीचा कार्यक्रम सादर करण्यात आला आणि सोसायटीमधील उपस्थित नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येऊन मतदानाची शपथ घेण्यात आली. सदर सोसायटीमध्ये देखील ध्वनिक्षेपकामार्फत मतदान जनजागृतीपर गीत वाजवून उपस्थित नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.

तसेच अशोकनगर वालधुनी येथे ईद या सणाचे औचित्य साधून श्री.अन्सार शेख यांचे दर्गा शेजारी मतदान जनजागृती चा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ध्वनीक्षेपकाद्वारे मतदान जनजागृती पर गीत वाजवून उपस्थित नागरिकांना उपस्थित नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देत मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. तसेच उपस्थितांसमवेत मतदानाची शपथ घेण्यात आली. सदर प्रसंगी 142 स्वीप पथकातील प्रणव देसाई, समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, भारती दगळे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. मतदानाविषयी नगरिकांच्या मनात कोणत्याही प्रकारचे संभ्रम नसावा,तसेच प्रत्येकाने निर्भीडपणे मतदान करावे हाच या प्रभात फेरीचा उद्देश्य होता. ज्याला नगरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

Translate »
×