महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
कला/साहित्य ताज्या घडामोडी

पु. ल.कट्टा कल्याण तर्फे पाऊस काव्य महोत्सवाचे आयोजन

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – पु ल कट्टा कल्याण या  सास्कृतिक, साहित्यिक, संस्थेच्या वतीने नवोदित बाल कवी यांच्या साहित्य प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरचित “पाऊस कवितांचा महोत्सव”  रविवार दि २ जुलै  रोजी कल्याण येथे आयोजित करण्यात येणार आहे. या विषयाच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांकडून कविता मागवण्यात येत आहे .

यात सहभागी होणारे कवी हे इयत्ता ५ वी ते १० वी च्या ईयत्तेतिल  असतील. कविता स्वरचित असावी, कविता वाचनासाठी कविने स्वत: हजर असणे आवश्यक आहे. सर्व सहभागी कवींना स्वत: कविता वाचल्या नंतरच सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. कविता पाठवून नाव नोंदणी न केलेल्या  कवींना आयत्यावेळी कविता वाचता येणार नाहीत.  कविता कशी रुजते कशी फुलते, कविता कशी वाचावी, काय वाचावे कसे वाचावे या बाबत  नामवंत साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

तसेच आलेल्या कवितांपैकी परीक्षक  मंडळाने निवडलेल्या कविता सादर करण्याची संधी कवींना मिळेल. तरी इच्छुक बाल कवींनी आपल्या स्वरचित दोन कविता शाळेचे नाव पत्ता, इयत्ता, कविचे सम्पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक इत्यादि माहिती सह दिनांक २८ जून २०२३ रोजी पर्यंत रमेश करमरकर ७७३८७२३६९२, रमेश आव्हाड ९८७०३३४४५१, महेंद्र भावसार ९८६९८६९८४४ या  व्हाट्सअप नंबरवर पाठवाव्यात.

 तरी जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांनी या प्रवेश विनामूल्य असलेल्या पाऊस काव्य महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन शालेय विद्यार्थ्यांना तसेच त्यांचे पालकांना आणि शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांना पु.ल.कट्टा कल्याणचे संयोजक डॉ. गिरीश लटके आणि अर्जुन डोमाडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×