नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर / प्रतिनिधी – राज्य सरकारने शासकीय कर्मचारी व अधिकारी यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा जी आर काढला आहे. हा शासनाच्या निर्णयाने बेरोजगार युवक यांची शासकीय नोकरी संदर्भातील स्वप्ने आता मावळण्याच्या मार्गावर आहे. या शासन निर्णयाविरोधात सोलापूरमध्ये देखील निदर्शने करण्यात आले.
राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कंत्राटी भरती प्रक्रियेच्या विरोधात आक्रमक होत राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर शहर जिल्हाच्या (शरद पवार गटाच्या) वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर पुनम गेट येथे निदर्शने करण्यात आली. सरकारने संविधानिक रित्या महाराष्ट्रात कंत्राट पद्धतीने भरती सुरू केली आहे.कंत्राटी कामगार धोरण पद्धत महाराष्ट्रातून रद्द करा.या मागणीसाठी सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जमून निदर्शने केली.