नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर/प्रतिनिधी – मणिपूर येथे झालेल्या विभत्स व अत्यंत किळसवाना प्रकार महिलांसोबत वारंवार विनयभंग करीत नग्न धिंड काढीत सामुहिक बलात्कार करणाऱ्या घटनेच्या विरोधात वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने व्हेरायटी चौक येथे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षा व महिला विकास मंत्री स्मृती इराणी यांचा राजीनामाच्या मागणीसह मणिपूरच्या सरकारला बरखास्त करून राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी करीत भारताचे प्रधानमंत्री व गृहमंत्री तसेच मणिपूरचे मुख्यमंत्री यांना वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने साडी बांगड्या आणि कुंकवाचा करंडा पाठवण्यात आला आहे.
या आंदोलनात वंचित बहुजन युवक आघाडी, वंचित बहुजन आघाडी, सम्यक् विद्यार्थी आंदोलन, फुले शाहू अंबेडकर विद्वत सभेचेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या घटनेचा निषेध नोंदवला.