नेशन न्यूज मराठी टीम.
पुणे/प्रतिनिधी – अगोदरच कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे महिला बचत गट,लहान मोठे उद्योग व्यवसाय, कारखाने बंद पडल्यामुळे महिला व युवकांमध्ये बेकारी आली आहे. २०२० पासून केंद्र सरकारने गॅस सिलिंडरची सबसिडी बंद केल्यामुळे नाईलाजास्तव विना अनुदानित गॅस सिलिंडर घेणे अत्यावश्यक झाले आहे. महिन्याच्या सुरवातीलाच घरगुती गॅसच्या किंमतीत ५० रुपये दरवाढ करुन सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. आजच्या घडीला घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ११५० /- ची मजल मारली आहे. या निषेधार्थ वंचित बहूजन आघाडी पुणे प्रभाग क्रमांक ४७ व ४८ यातील सर्व कार्यकर्ते मिळून विआयआयटी हाॅस्टेल चौक अप्पर गंगाधाम रोड पुणे येथे चुल पेटवून भाकरी थापुन सरकारच्या निषेधार्थ बोंबाबोंब अंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष मुनव्वार कुरेशी, महासचिव सुनिल धेंडे, महिला आघाडी पुणे शहर महासचिव रेखाताई चौरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष विकास बेगडे, अजय भालशंकर, बापू बनसोडे, जाकीर शेख, प्रसिद्धी प्रमुख नवनीत अहिरे, संदीप चौधरी, निरंजन कांबळे, संघटक जिवन रोकडे, सतिश रणवरे, सचिव बि पी सावळे सर, पर्वती विधानसभा उपाध्यक्ष अॅड रविंद्र गायकवाड, पर्वती विधानसभा अध्यक्ष दौलत जहा शेख, उज्वला रविंद्र गायकवाड, प्रभाग अध्यक्ष किर्ती गाडे, सरिता पालखे,पुजा डोलारे, मधुकर दुपारगुडे महासचिव खडकवासला विधानसभा मतदारसंघ, राजेंद्र कांबळे युवक अध्यक्ष हवेली तालुका पश्चिम विभाग, सोमनाथ गोरसे सचिव हवेली तालुका पश्चिम विभाग,बसवराज गायकवाड संघटक हवेली तालुका पश्चिम विभाग , राहुल रिकिबे, सचिन धिरे, जेष्ठ नेते शामराव गोरे, सुरेश गायकवाड, उत्तम गायकवाड, संदीप जाधव, राजरत्न गाडे, चंद्रमणी गाडे अनिल अहिरे, गणेश अहिरे, अरुण अहिरे, मंगल पायाळ, शारदा भोसले, रुपाली अहिरे, विमल आवाड, रोहिणी बनसोडे, साधना बनसोडे, सुरेखा माने, आशा भोसले, तानाजी बनसोडे, कबीर आवाड, आनंद भोसले, स्वप्नील गायकवाड, येवले, परमेश्वर सनादे, सागर गायकवाड, बंटी डोलारे, शैलेश भिडे,राजरत्न गाडे, महेश शिंगे, रावसाहेब साबळे, मिलिंद साबळे, गौरी आरवडे, राहुल नागटिळक , सुरेखा माने, प्रमोद जाधव सर, कल्याण चौधरी तसेच पुणे शहरातील, विधानसभा व प्रभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हितचिंतक नागरिक महिला वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.