नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा / प्रतिनिधी – जलंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक समस्यांनी ग्रासले आहे.या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज पासून जलंब येथील आरोग्य केंद्रासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
शेगांव तालुक्यातील जलंब येथील आरोग्य केंद्रातील ओपीडी सकाळ व संध्याकाळ सुरु ठेवावी आणि बायोमॅट्रीक थंब मशिन सुरु करुन त्याचा नियमित वापर करण्यात यावा, रात्रपाळीला पुरुष डॉक्टर देण्यात यावा, ज्या कर्मचाऱ्यांना १८ ते २० वर्ष एकाच ठिकाणी झाले त्यांची बदली करण्यात यावी, मनमानी कारभाराला आळा घालण्यात यावा, येणाऱ्या रुग्णांना सोयीसुविधा पुरवाव्या अश्या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.मागील अनेक दिवसापासून आरोग्य प्रशासनाला निवेदने व तक्रारी करण्यात आले आहेत.
मात्र प्रशासनाने कुठलीच दखल न घेतल्यामुळे जलंब, मोरगाव, डिग्रस, बेलुरा, माटरगाव खुर्द, कुरखेड भोटा, पहुरजिरा, भास्तन, कठोरा येथील सरपंचांनी धरणे आंदोलन सुरू केले आहेत लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.