Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image चर्चेची बातमी ठाणे

डोंबिवलीत रिफायनरी प्रकल्पविरोधात कोकणवासी रस्त्यावर

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे -कोकणात रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला कोकणवासीयांनी कडाडून विरोध केला आहे. पोटापाण्यासाठी चाकरमानी शहरात नोकरी- व्यवसाय करत असली तरी हा प्रकल्प कोकणात नको असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे प्रकल्पविरोधातचाकरमान्यांनी शहरातही आंदोलन करण्यास सुरुवात केली.रविवारी डोंबिवलीत चाकरमान्यांनी मोठे आंदोलन केले.त्याच बरोबर सरकारला रिफायनरी रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे.

डोंबिवलीमधील चाकरमानी तरुणांनी कोकणात होणाऱ्या रिफायनरी विरोधात डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे एकत्र जमा होउन आंदोलन केले. विशेष म्हणजे या आंदोलना तरुण वर्गाचा मोठा सहभाग या आंदोलनात दिसून आला आहे. जीव गेला तरी चालेल पं आम्हाला कोकण वाचवायचा आहे आम्हाला येथे विषारी रिफायनरी होऊ द्यायची नाही.सरकारने कितीती दडपशाही केली तरी आम्ही आमचे आंदोलन हे सुरूच ठेवणार आहेअसे आंदोलन कर्त्यांनी या वेळी सांगितले. सरकारने आम्हाला गृहीत धरू नये असा इशाराहि या वेळी त्यांनी दिला.

डोंबिवलीतच नव्हे तर प्रत्येक शहरात जुं आंदोलन उभे करणार असल्याचे त्यांनी सागितले. फार कमी वेळात सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व तरुण निसर्गरम्य कोकण वाचविण्यासाठी एकत्र आले.चाकरमान्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाची शेवट फडके रोडवरील आप्पा दातार चौकात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X