नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – सत्ताधारी भाजपने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना रावणाच्या रूपात दाखवले आहे. राजकारण करताना सभ्यतेची एक पातळी असते. ही पातळी भाजपने याआधीच अनेकदा ओलांडली आहे. मात्र, आता जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या राहुल गांधी यांची तुलना थेट रावणासारख्या राक्षसाशी करण्यापर्यंतच्या पातळीवर भाजप पोहोचला आहे. असे म्हणत मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने भाजपचा विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले आहे.
या आंदोलनात मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी खासदार संजय निरुपम हे उपस्थित होते. या आंदोलनात अभिनव पद्धतीने भाजपचा निषेध करण्यात आला आहे.
गांधी नावाचं खौफ भाजपच्या डोक्यात आहे. त्यामुळे भाजप राहूल गांधींना बदनाम करण्याचं षडयंत्र करत आहे. असे विजय वडेट्टीवार याप्रसंगी म्हणाले आहेत. यावेळी काँग्रेस कडून भाजपा विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.