मुंबई/प्रतिनिधी – सकल मराठा समाज यांच्याकडून जालना येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मुंबई लालबाग येथे आंदोलन करण्यात आले. जालना मधील घटनेनंतर महाराष्ट्रात मराठा समाजाकडून जागोजागी आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येत आहेत. सर्व मराठा समाज एकत्र येऊन आरक्षणासाठी लढाई लढत आहे .
मात्र मुंबई डब्बेवाला संघटनेतर्फे ही मराठा आरक्षण आंदोलनला समर्थन देण्यात आले आहे आणि आम्ही पिढ्यानपिढ्या डब्बेच वाहायचे का? आमच्या मुलांनी सुद्धा शिकलं पाहिजे. म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्या आणि जालना मध्ये झालेल्या घटनेचा डब्बे वाल्यांतर्फे निषेध नोंदवण्यात आला. सरकारने जागं होऊन मराठा समाजाला त्यांचं आरक्षण मिळवून द्यावं. जमत नसेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे देखील आंदोलक सांगितला.