नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी -चांदवड येथील गणूर चौफुलीवरील विश्रमगृहाच्या बाहेर रस्त्यालगत आज दि. 26 ऑक्टोबर रोजी पासून मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मराठा समाज बांधवांनी आंदोलन तीव्र केले. चांदवड -मनमाड महामार्ग अडवीत गुणरत्न सदावर्तेच्या पुतळ्याला जोडो मारो आंदोलन केले.
आज मराठा समाजाच्या तरुणांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोड फोड केली. यावेळी मराठा समाजाविषयी गुणरत्न सदावर्ते यांनी अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ चांदवड येथे मराठा समाज आक्रमक होत गुणरत्न सदावर्तेच्या पुतळ्याला जोडो मारो आंदोलन केले असून सदावर्तेच्या विरोधात घोषणा बाजी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीसांनी वाहतुक सुरळीत केली, दरम्यान या आंदोलनास मुस्लीम समाजाच्या वतीने फिरोजभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्र्यानी पाठींबा दिला.