WWW.nationnewsmarathi.com
पंढरपूर/प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी त्याचा विरोध केला होता. या विरोधानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, असे सांगितले. “त्यांच्या कमरेत लाथ घालून बाहेर काढा”, असेही विधान संजय गायकवाड यांनी भुजबळ यांच्याबद्दल केले होते.त्याचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटत असून ओबीसी आरक्षण चळवळीतील कार्यकर्त्यांकडून आमदार संजय गायकवाड यांचा निषेध केला जात आहे.
आज पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे देखील ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध केला.तर ओबीसी कार्यकर्ते संजय गायकवाड यास धडा शिकविल्याशिवाय रहाणार नाहीत असा इशारा दिला.