नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी आजपासून राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय, शिक्षक आणि शिक्षकेतर अशा जवळपास 17 लाख कर्मचारी संपावर बेमुदत पुकारला आहे. या संपात नाशिक जिल्ह्यातील जवळपास 25 हजार कर्मचारी सहभागी असल्याचा दावा करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोर नर्सिंग असोसिएशनतर्फे आंदोलन करीत घोषणाबाजी करण्यात येत आहे. यात जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालयातील जवळपास 1800 कर्मचारी सहभागी असल्याचे समजते.
या संपाचा रुग्णसेवेवर जास्त परिणाम होऊ नये, यासाठी अधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी सेवा बजावणार आहेत. राज्य शासनाने लवकरात लवकर जुनी पेन्शन योजनेच्या मागणीचा विचार करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. संपूर्ण आयुष्य शासनाची सेवा करून जेव्हा वृद्ध होतो तेव्हा पेन्शन हा त्याला महत्वाचा आधार ठरतो. पण जर पेन्शन नसेल तर त्या कर्मचार्याचा येणारा काळ खूप कठीण असतो त्यामुळे निवृत्त कर्मचार्याला पेन्शन मिळालीच पाहिजे असे म्हणणे कर्मचारी आंदोलन कर्त्यांनी मांडले आहे