नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अकोला/प्रतिनिधी – अकोला शहरातल्या तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या 7 वर्षांपासून या रस्त्यावर नागरिक त्रस्त झाल्याने,वंचित बहुजन आघाडीने या रस्त्यावरील खड्यांना खासदार,आमदार आणि बांधकाम विभागाचे नाव दिले आहे. वंचितचे या आधी सुद्धा या रस्त्यासाठी आंदोलन करत रस्त्यावर बेशरमाची झाडे लावली होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने उपोषण सुरू केले होते. मात्र रस्ता न झाल्याने शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्या दालनात अंगावर डिझेल घेऊन आत्मदाहनाचा प्रयत्न केल्यानंतर अधीक्षक अभियंता यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिले होते.
मात्र काम सुरू न झाल्याने. अखेर वंचितने आज फलक लावून खासदार, आमदार आणि बांधकाम विभागाच्या नावाचे फलक खड्यांवर लावत निषेध व्यक्त केला आहे.