महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

अवैधरित्या मद्य साठवणूक विरोधातील धडक कारवाईत २० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

नेशन न्यूज मराठी टीम.

नांदेड– राज्य उत्पादक शुल्क देगलूर विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे दारूबंदी गुन्ह्याखाली मुखेड तालुक्यातील एकलारा व देगलूर तालुक्यातील तमलूर येथे छापा मारून 20.50 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कातिलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास 1800833333 व व्हॉटसॲप क्र. 8422001133 तसेच दुरध्वनी क्रमांक 02462-287616 वर संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे उत्पादन शुल्क भरलेले 1 हजार 100 बॉक्स घेऊन निघालेल्या वाहनातील मद्यसाठा अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने इतरत्र साठवून नंतर त्या वाहनाची तुळजापूर येथे अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला होता. यातील 415 बॉक्स तुळजापूर पोलीसांनी तर 30 बॉक्स हट्टा पोलीसांनी जप्त केले आहेत. उर्वरीत 262 बॉक्स मद्यसाठा निरीक्षक देगलूर यांनी मुखेड व देगलूर तालुक्यात 2 ठिकाणी जप्त केला आहे. या गुन्ह्यात 3 आरोपीला ताब्यात घेतले असून त्यांना तीन दिवसाची कोठडी मिळाली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक ए. एम. पठाण हे करीत आहेत.

ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क देगलूर विभागाच्या पथकाने निरीक्षक ए. एम. पठाण, दुय्यम निरीक्षक रामलिंग सुर्यवंशी, स. दु. नि. शिवाजी कोरनुळे, जवान उज्जल सदावर्ते, जवान नि वाहन चालक फाजिल खतिब यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. ही कारवाई दुय्यम निरीक्षक राजकिरण सोनवणे, हरि पाकलवाड, ए. जी. शिंदे, मो. रफी, बालाजी पवार, विकास नामवाड, परमेश्वर नांदुसेकर, आर. बी. फाळके, शिवदास नंदगावे, दिलीप जाधव यांनी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×