नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ दि. ०४ जून २०२३ रोजी सकाळी ०९.०० ते सांयकाळी १८.०० या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालयात एकूण २० उपकेंद्रांवर २ सत्रात आयोजित केली आहे. या दिवशी परीक्षा काळात परीक्षा केंद्रांवर मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी कळविली आहे.
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा चालू असताना परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रिया संबंधी अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी खेरीज करुन परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यास तसेच झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ, सदरची दुकाने, सेवा बंद ठेवण्याबाबत व मोबाईल फोन वापर करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टीसेस ऍक्ट युनिर्व्हसिटी बोर्ड ऍन्ड अन्डर स्पेसिफाईड एक्झामिनेशन ऍक्ट १९८२ मधील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. हा आदेश दि.०४ जून २०२३ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सायंकाळी १८.०० वाजेपर्यंत अंमलात राहील असे ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उप आयुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी कळविले आहे.