महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image देश लोकप्रिय बातम्या

रेल्वेची शंभर टक्के विद्युतीकरण पुर्ततेकडे वाटचाल

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – भारतीय रेल्वेने आपल्या  ब्रॉडगेज नेटवर्कच्या 100 टक्के विद्युतीकरणाची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.  यामुळे इंधनाचा योग्य प्रकारे वापर  होउून,  इंधनावर होणारा खर्च कमी होईल.  त्यामुळे मौल्यवान परकीय चलनाची बचत होणार आहे. त्याच बरोबर प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

2022-23 या आर्थिक वर्षात, ऑक्टोबर 2022 पर्यंत भारतीय रेल्वेने 1223 किलोमीटर रेल मार्गाचे (आरकेएमचे) विद्युतीकरण पूर्ण केले आहे. याआधीच्‍या वर्षी म्हणजे  आर्थिक वर्ष 2021-22 मध्‍ये याच कालावधीत 895 आरकेएमचे  विद्युतीकरण केले होते. मागील वर्षापेक्षा या आर्थिक वर्षात  36.64% अधिक काम विद्युतीकरणाचे झाले आहे.

भारतीय रेल्वेच्या इतिहासात 2021-22 या कालावधीत 6,366 आरकेएमचे विक्रमी विद्युतीकरण झाले होते. ही गोष्‍ट इथे उल्लेखनीय आहे. यापूर्वी, 2020-21 मध्ये सर्वाधिक विद्युतीकरण 6,015 आरकेएम झाले होते.

भारतीय रेल्वेच्‍या ब्रॉडगेज नेटवर्कचे  (कोंकण रेल्वे महामंडळासह) 31.10.2022 पर्यंत  65,141 आरकेएमपैकी 53,470 ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. हे प्रमाण  एकूण ब्रॉडग्रेड  नेटवर्कच्या 82.08% इतके आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×