नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नव्या निर्णयामुळे विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थापासून बनविण्यात आलेले आणि एकदाच वापर होणाऱ्या स्ट्रॉ, ताट, कप, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर आदी वस्तूंच्या उत्पादनास अनुमती देण्यात आली आहे. अशी माहिती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सचिव प्रविण दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणेबाबत माहिती देण्यासाठी मंत्रालय वार्ताहर संघात पर्यावरण विभागाचे संचालक अभय पिंपरकर, उपसचिव, चंद्रकांत विभुते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नंदकुमार गुरव यावेळी उपस्थित होते.
सचिव दराडे म्हणाले की, प्लास्टिक आणि थर्माकोल उत्पादन बंदीबाबत पर्यावरण विभागाच्या शक्तीप्रदत्त समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, कामगार मंत्री सुरेश खाडे, पर्यावरण विभागाचे सचिव प्रविण दराडे आणि शक्तीपदत्त समितीचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थांपासून बनविलेल्या एकल वस्तूंना वापराची अनुमती देण्यात आलेली आहे. मात्र, सदरहू वस्तु कंपोस्टेबल पदार्थांपासून बनविलेल्या असल्याबाबत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करुन घेणे बंधनकारक राहणार आहे. राज्यातील उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळावी आणि प्लास्टिकला पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध असल्यामुळे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या धोरणामध्ये सुसंगती राहण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला असेही श्री. दराडे म्हणाले.
सचिव श्री. दराडे म्हणाले की, या संदर्भातील तज्ज्ञांच्या समितीने बैठक घेवून अभ्यास करून बदला बाबत शक्तीप्रदत्त समितीला शिफारस केली होती. त्यानुसार झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल अधिसुचनेमध्ये सुधारणा करण्याकरिता उद्योग-व्यावसायिक, उद्योजक संघटना व काही नागरिकांमार्फत शासनाकडे निवेदने प्राप्त झाली होती. विघटनशील पदार्थापासून तयार करण्यात येणाऱ्या एकल वापर वस्तूंच्या उत्पादनासाठी अनुमती देण्याची मागणी करतानाच पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या जाडीचा उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असेल अशा ठिकाणी प्लास्टिक पॅकेजिंग जाडीची मर्यादा शिथिल करण्याची मागणी केली होती. नॉन-ओवेन पॉलीप्रॉपीलीन बॅग्स ६० ग्रॅम पर स्क्वेअर मीटर (जीएसएम) पेक्षा जास्त जाडीच्या उत्पादनाला परवानगीचीही निवेदनांद्वारे मागणी करण्यात आली होती. या मागणीचा शासनाने विचार करुन महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये केंद्र शासनाच्या अधिसुचनेशी सुसंगत सुधारणा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या नव्या निर्णयामुळे पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीकच्या जाडीचा उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असेल अशा ठिकाणी वगळून इतर ठिकाणी पॅकेजिंगकरिता वापरण्यात येणारे प्लास्टीक पॅकेजिंग (आवरण) ५० मायक्रॉनपेक्षा जास्त असणे बंधनकारक राहील व नॉन ओव्हन पॉलीप्रॉपीलिन बॅग्ज) ५० ग्रॅम प्रति चौरस मीटर (जीएसएम) पेक्षा जास्त जाडीला अनुमती देण्यात आल्याची अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयामुळे राज्यामध्ये उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे असेही श्री.दराडे म्हणाले.
Related Posts
-
केडीएमसीची एकल वापर प्लास्टिक बंदी आणि कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका घन…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…
-
डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी आवाहन
प्रतिनिधी. औरंगाबाद - भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
३० व ३१ ऑक्टोबरला एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी…
-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतर्फे अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामाजिक न्याय व विशेष…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील भूदान व ग्रामदान…
-
डोंबिवली पेंढारकर कॉलेज व घरडा सर्कल परिसरात प्रायोगिक तत्वावर सम विषम व नो पार्किंग
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील…
-
विमानतळावर संरक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - संरक्षणाची गरज सातत्याने…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात ६१५ खाटांचे रुग्णालय व नवीन पदव्युतर अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात…
-
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येणार
मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
आदिवासी आश्रम शाळा व कर्मचारी यांचे आंदोलन
नेशन न्यूज' मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आदिवासी विकास…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – “शेतकरी व कष्टकरी जनतेचा…
-
केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीडच्या अंबाजोगाईत…
-
केडीएमसीच्या 'ह' व 'आय' प्रभागातील अनधिकृत बांधकामावर हातोडा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिका…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत पोलीस भरतीच्या…
-
१ ली ते ३ री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी या विषयाच्या गोंडी व माडीया भाषेतील पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. गडचिरोली - पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
-
उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय शुक्रवारी सोलापूर विद्यापीठात
सोलापूर - राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 'उच्च…
-
अनुदानित खासगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना खुश खबर
मुंबई /प्रतिनिधी - राज्यातील शासन अनुदानित खासगी आयुर्वेद व युनानी…
-
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील…
-
मृद व जलसंधारण पेपरफुटी प्रकरणात १० आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावतीच्या नांदगाव पेठ…
-
होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत…
-
आता एफसीआयची विभागीय कार्यालये औरंगाबाद व अमरावतीत
नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय अन्न महामंडळाची दोन विभागीय कार्यालये औरंगाबाद आणि…
-
राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणुकीवर निर्बंध नाहीत
मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत सर्व…
-
खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश
मुंबई प्रतिनिधी- राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन…
-
वंचितचे आदिवासी व भटक्या विमुक्त जमातीच्या विविध मागणीसाठी आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - विमुक्त जाती…
-
१८ नवनियुक्त मंत्र्यांनी घेतली पद व गोपनीयतेची शपथ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार…
-
शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे नोंदविली जाणार
मुंबई/प्रतिनिधी - सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील…
-
जातीपातीचे राजकारण व भ्रष्टाचारामुळे जनतेने भाजपला नाकारले -यशोमती ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस बहुमताकडे…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या…
-
शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत केडीएमसीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील शहर स्वच्छ…
-
शेतकरी बांधवांना सातबाऱ्याची डिजिटल प्रत विनामूल्य व घरपोच
अमरावती/प्रतिनिधी - शासनाने संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण…
-
बचतगट व गटशेतीच्या माध्यमातून महिला शेतकरी व उद्योजकांनी विकास साधावा कृषि मंत्री दादाजी भुसे यांचे प्रतिपादन
नाशिक/प्रतिनिधी - बचतगट व गटशेतीच्या माध्यमातून महिला शेतकरी व उद्योजकांनी विकास…