नेशन न्यूज मराठी टीम.
पुणे / प्रतिनिधी – कारागृहातील कैद्यांना आपल्या कुटुंबीयांशी फोनवर बोलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सरकारकडून परवानगी मिळताच महाराष्ट्रातील सर्वच कारागृहामध्ये कैद्यांना कुटुंबीयांशी बोलण्यासाठी टेलिफोनिक सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती कारागृहाचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
प्रत्येक कैद्याला त्याच्या कुटुंबीयांशी आठवड्यातून एकदा दहा मिनिटापर्यंत बोलू देणार आहे. पुण्याच्या येरवडा जेलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट कार्ड देऊन, त्यांच्या नातेवाईक किंवा वकिलांशी आठवड्यातून एकदा दहा मिनिटे बोलण्याची मुभा दिली. त्याचा चांगला फायदाही दिसून आला. तसेच इतर सोयीसुविधाही कायद्यांना देण्याचा प्रयत्न असल्याचेही अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. कारागृहात सुरक्षेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही ड्रोन बॉडी स्कॅनर यासारखेही बाबींवर लक्ष केंद्रित केला आहे.