नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – कारागृहातील शिक्षाधीन बंदी ना केलेल्या कामाकरिता मिळणाऱ्या बंदीवेतनातून दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेमधून 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज 7 टक्के इतक्या व्याज दराने उपलब्ध करून देण्याची योजना येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे तसेच या संदर्भातील शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.
कारागृहातील बंद्यांच्या जीवनमानात सुधारणा व त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने गरजेकरता त्यांना कुटुंबीयांसाठी कर्जरूपाने रक्कम उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
देशामध्ये अशाप्रकारच्या खावटी कर्जाची ही नाविन्यपूर्ण योजना म्हणून पहिलीच योजना असणार आहे.
तसेच कारागृहात शिक्षा भोगत असताना तेथे काम करून मिळालेल्या उत्पन्नापोटी कर्ज मिळणारी ही देशातील पहिलीच अभिनव कर्ज योजना ठरणार आहे. याद्वारे एक कल्याणकारी योजना मूर्त स्वरूपात येऊन अंदाजे १०५५ बंद्यांना, कैद्यांना योजनेचा लाभ होऊ शकतो, असे गृहमंत्री म्हणाले.
कारागृहामध्ये अनेक बंदी दीर्घमुदतीची शिक्षा भोगत असतात. यातील बहुसंख्य बंदी हे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असल्याने अशा बंद्यांना दीर्घकाळ तुरूंगात रहावे लागल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब हवालदिल होऊन कुटुंबियांमध्ये औदासिन्य, नैराश्य, अपराधीपणाची जाणीव निर्माण होऊ शकते.
तसेच तुरूंगात गेलेल्या व्यक्तीने कौटुंबिक कर्तव्यात कसूर केल्याची भावना कुटुंबात निर्माण होते. अशा परिस्थितीत बंद्यास, कैद्यास त्याच्या कुटुंबाच्या गरजेकरिता कर्जरूपाने रक्कम उपलब्ध करून दिल्यास बंदी/कैद्याबद्दल कुटुंबियांमध्ये सहानुभूती व प्रेम वाढून कुटुंबातील वातावरण सुदृढ राहण्यास मदत होईल, असे श्री.वळसे-पाटील यांनी सांगितले.
बंद्याची/कैद्याची कर्ज मर्यादा, शिक्षेचा कालावधी, त्यामधून त्याला मिळू शकणारी संभाव्य सूट, वय, वार्षिक कामाचे अंदाजित दिवस, प्रति दिवसाचे किमान उत्पन्न यानुसार प्रस्तुत कर्जसुविधा ठरविली जाईल. अशा प्रकारच्या कर्जाला जामीनदारांची आवश्यकता असणार नाही. हे कर्ज संबंधित बंद्याला विनातारण व केवळ व्यक्तीगत हमीवर देण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या कर्जाच्या रकमेचा उपयोग संबंधित स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी अथवा आपल्या वकीलांची फी देण्यासाठी अथवा इतर कायदेशीर बाबींसाठीच करेल याची दक्षता व जबाबदारी सर्वस्वीपणे कैद्यास कर्ज देण्याऱ्या बँकेची असेल. तसेच बँकेकडून कर्जाच्या परतफेडीमधून वसूल करण्यात येणाऱ्या रकमेच्या 1 टक्के इतका वार्षिक निधी कैद्यांच्या ‘कल्याण निधी’ला देण्यात येणार आहे. या बैठकीला अपर मुख्य सचिव गृह आनंद लिमये, अपर मुख्य सचिव (अपील आणि सुरक्षा) नितीन गद्रे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अतुलचंद्र कुलकर्णी, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेचे विद्याधर अनास्कर यांसह गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Related Posts
-
देशातील कर्करोग विषयक संशोधन आणि उपचाराला चालना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकार देशातील…
-
कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने…
-
ऑक्टोबर मध्ये देशातील कोळसा उत्पादनात १८ टक्के वाढ,उत्पादन ४४८ दशलक्ष टनांवर पोहोचले
नवी दिल्ली/प्रतिनिधी - या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात देशातील एकूण कोळसा…
-
कृषी कर्ज मित्र योजना, शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध
मुंबई/प्रतिनिधी - इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध…
-
प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू
नेशन न्यूज मराठी टीम. दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय महिला…
-
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्याथेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…
-
गुजराती व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी मोदींनी देशातील शेतकरी मारला-प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिकचा दिंडोरी मतदारसंघ…
-
कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना,कृषी यांत्रिकीकरण योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कृषी विभागाची एक महत्वपूर्ण…
-
अल्पसंख्याक लाभार्थींना लघु व्यवसायाकरिता मुदत कर्ज योजनेसाठी आले ४१७ अर्ज
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अल्पसंख्याक समुहातील घटकांसाठी मौलाना…
-
शेतकऱ्याच्या फायद्याची शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजना
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वैयक्तिक…
-
आरोग्य विभागाच्या तत्सम योजना जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबविण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार…
-
केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविण्यास मान्यता
मुंबई /प्रतिनिधी- मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना ही…
-
विक्रीकराची अभय योजना-२०२२ ला राज्यभरातील व्यापारीवर्गातून अभूतपूर्व प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शासनाच्या जीएसटी विभागाने जाहीर केलेल्या…
-
राज्यातल्या आरोग्य संस्थांच्या उभारणीसाठी हुडकोकडून कर्ज
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - राज्यातील नवीन आरोग्य संस्थांचे…
-
महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - मनोज गुंजाळआणि सपना बाबर या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून ४ मार्च ते ३१ मार्च दरम्यान अभय योजना
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - प्रशासनाकडून आर्थिक वर्षाच्या…
-
स्वाधार योजना शिष्यवृत्ती साठी विद्यार्थ्यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - फुले -शाहू-आंबेडकर…
-
महाराष्ट्रात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी…
-
मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन…
-
प्रधानमंत्री आवास योजना अभियानात कल्याण तालुका प्रथम
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे - केंद्र शासनाच्या सर्वांसाठी…
-
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यातील फळबाग उत्पादक…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
कोकणातील काजू उत्पादकांसाठी शासनाकडून व्याज दर सवलत योजना
मुंबई/प्रतिनिधी - कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी…
-
मोहोळ येवती पाणीपुरवठा योजनेला बाळासाहेब ठाकरे अमृतवाहिनी योजना नाव देण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - मोहोळ शहरासाठी शाश्वत पाणीपुरवठयाची मागणी खूप वर्षांपासून…
-
कल्याणच्या मध्यवर्ती कारागृहातील ३० कैद्यांना कोरोनाची लागण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणच्या मध्यवर्ती कारागृहातील 30 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचा…
-
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळावतीने कर्ज योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-१९ या महामारीत ज्या अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू…
-
जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी…
-
लवकरच कैद्यांना कारागृहातून फोनवर कुटुंबियांशी बोलता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - कारागृहातील कैद्यांना…
-
चित्रीकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राज्यभरात लागू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – राज्यातील एक खिडकी योजनेंतर्गत…
-
देशातील जनशक्ती इंडीया आघाडीसोबत,ही शक्ती चार जूनला दिसेल - आदित्य ठाकरे
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. संभाजीनागर/प्रातिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
ग्रामपंचायतींच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा योजना
नवी दिल्ली/संघर्ष गांगुर्डे - पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत (XVFC) जिल्हा पंचायतींसह…
-
पशुसंवर्धन विभागाच्या अनुसूचित जाती-जमातीच्या वैयक्तिक लाभाच्या योजना सुरु
सोलापूर/अशोक कांबळे - जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने पशुसंवर्धन विभागामार्फत सन…
-
डिजीटल समावेशासाठी, उत्कृष्ट इंटरनेट सेवा प्रदात्यांच्या मान्यतेसाठी दूरसंचार विभागाची योजना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - डिजिटल…
-
अमरावतीत देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - संत्रा उत्पादक बाजार…
-
मुंबईत देशातील विविध प्राणिसंग्रहालयातील शिक्षण अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई…
-
कृषि विभागामार्फत परंपरागत कृषि विकास योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जमिनीची सुपिकता व सेंद्रिय…
-
देशातील जनता गांधी परिवारा सोबत -नाना पटोले
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नांदेड/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
देशातील १४६ धरणांमध्ये सद्यस्थितीत ५९.५०३ अब्ज घनमीटर पाणीसाठा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय जल आयोग…
-
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - जुनी पेन्शन योजना लागू…
-
नवी मुंबई महानगरपालिकेची वाहतूक नियमनासाठी जंक्शन बॉक्सची अभिनव संकल्पना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई शहरात…
-
मौलाना आझाद महामंडळामार्फत अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास…
-
आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राबविण्यासाठी सेवा पुरवठादारास मुदतवाढ
मुंबई /प्रतिनिधी - महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी…
-
मुख्याध्यापकाची अभिनव कल्पना, लसीकरणासाठी दुचाकीवरून जनजागृती
नंदुरबार/ प्रतिनिधी - कोरोना लसीकरणाला गावातील नागरिकांचा विरोध, गैरसमजामुळे नोंदणीला…
-
महाराष्ट्रातील तिघांना जीवन रक्षा पदक जाहीर,देशातील ५९ व्यक्तींना जीवन रक्षा पदक
प्रतिनिधी. नवी दिल्ली - दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या…
-
विद्यार्थ्यांसाठी टपाल विभागातर्फे दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांची फिलाटेली…
-
ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम् योजना, टास्क फोर्सचा अहवाल सादर
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मंत्री…