प्रतिनिधी.
यवतमाळ – समाजातील सर्वात महत्वाच्या घटकासाठी महिला व बालविकास विभाग काम करीत आहे. गावातील गरोदर माता, स्तनदा माता आणि लहान मुलांना योग्य आहार मिळाला तर आपण कुपोषणावर नक्कीच मात करू शकतो. त्यामुळे या घटकाला अंगणवाडीतून उत्कृष्ट पोषण आहार देणे, हाच विभागाचा मूळ उद्देश आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी केले.जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिला व बालविकास विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, महिला व बालकल्याण सभापती जयश्री पोटे, बांधकाम सभापती राम देवसरकर, जि. प. सदस्या स्वाती येंडे, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, माविमचे प्रमुख डॉ. रंजन वानखेडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनोद पाटील आदी उपस्थित होते.लॉकडाऊनच्या काळात विभागातर्फे घरपोच पोषण आहार देण्यात आला, असे सांगून ॲङ ठाकूर म्हणाल्या, आहाराच्या जागेवर निधी दिला तर खरच त्या पैशातून संबंधित लाभार्थी तसा आहार घेतात का, हे पाहणे गरजेचे आहे. पोषण आहाराच्या वितरणामध्ये कोणतीही कमतरता राहू देऊ नका. महिला व बालकल्याण विभागासाठी दरवर्षी नियोजन समितीमधून एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी अंगणवाडी सुधार व बांधकामाकरीता वापरता येईल. यवतमाळ जिल्ह्यात कुमारी मातांचे प्रमाण जास्त आहे. 2012 मध्ये कुमारी मातांच्या पुनर्वसनासाठी जागा देण्यात आली होती. त्याचे पुढे काय झाले, सदर प्रस्ताव कुठे थांबला आहे, याबाबत त्यांनी विचारणा केली असता या प्रकल्पांतर्गत पाच एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती. या जागेवर आधारगृहाचे बांधकाम करणे अपेक्षित आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. यावर मंत्री महोदय म्हणाल्या, येथे आधारगृह होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करू. एक स्त्री सर्व कुटुंबाला शिकविते. त्यामुळे शाळा सोडलेल्या मुलींचे प्रशिक्षण महत्वाचे आहे. कोणतेही मूल अनाथ राहू नये, यासाठी मुलांचे संरक्षण, निवारा गृहे याबाबत नियोजन करण्यात येईल. महिला व बालविकास विभागाचे जिल्ह्यात चांगले काम आहे. उद्योजकांच्या सीएसआर फंड या विभागाच्या कामासाठी वापरावा. यातून अंगणवाडी डीजीटल करणे, अर्धवट अंगणवाडी बांधकाम पूर्ण करणे, महिला व बालकल्याण भवन निर्माण करणे आदी कामे अधिका-यांनी करून घ्यावी, अशा सुचना त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी माविमच्या बचत गटातर्फे लावण्यात आलेल्या प्रदर्शनीची पाहणी केली. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे बचत गटातील अतिगरीब महिलांना 71 लाखांच्या धनादेशाचे वाटप ॲङ यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यात आर्णी तालुक्यातील तेजस्विनी लोकसंचालीत साधन केंद्राला 15 लक्ष 16 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच पुसद येथील लोकसंचालीत साधन केंद्र 12 लक्ष 73 हजार, उमरखेड येथील लोकसंचालीत साधन केंद्र 9 लक्ष 14 हजार, मारेगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचालीत केंद्र 12 लक्ष 44 हजार रुपये, पांढरकवडा येथील लोकसंचालीत साधन केंद्र 12 लक्ष 37 हजार आणि कळंब येथील प्रगती लोकसंचालीत साधन केंद्राला 9 लक्ष 14 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या ग्रामीण, नागरी व राज्य पातळीवरील कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला महिला व बालविकास विभागाचे अधिकारी तसेच तालुक्यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Related Posts
-
एसएनडीटी एमएससी क्लिनिकल पोषण आणि आहार तज्ज्ञ प्रयोगशाळेचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी - एसएनडीटी महिला महाविद्यालयात महिलांना केवळ रोजगार मिळविण्यासाठी…
-
शालेय पोषण आहार कंत्राटी कामगारांचे रस्त्यावर भाऊबीज साजरी करत आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी- शालेय पोषण आहार कंत्राटी…
-
आशा सेविका व शालेय पोषण आहार कामगारांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बीड/प्रतिनिधी- आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक व शालेय पोषण आहार कामगार यांना…
-
उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट…
-
संगमनेर तालुक्यात आरोग्य पोषण अभियानास सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - लहान बालके…
-
उत्कृष्ट पत्रकारिता-२०२० प्रवेशिका पाठविण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई प्रतिनिधी- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन,…
-
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२, प्रवेशिकांना ८ मार्चपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत…
-
भिवंडीत लसीकरणात स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्याची मागणी
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीतील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी करण्यात येणारे लसीकरण सध्या लसींच्या…
-
महावितरणन कडून पुरस्कार देऊन उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा गौरव
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणचे कोकण प्रादेशिक विभाग कार्यालय तसेच कल्याण परिमंडल…
-
उत्कृष्ट चित्ररथ विजेत्यांचा सन्मानपत्र देऊन मंत्रालयात गौरव
प्रतिनिधी. मुंबई - प्रजासत्ताक दिन 2020 मध्ये उत्कृष्ट चित्ररथ सादरीकरण…
-
अंगणवाडीतील स्तनदा मातांचा पोषण आहाराचा दर्जा निकृष्ट कसा? नागरिकांचा प्रशासनाला सवाल
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - वर्ध्यात स्तनदा…
-
राज्य शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - गणेशोत्सवात उत्कृष्ट…
-
कल्याण परिमंडलातील ५० उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्राच्या निर्मितीसोबतच राज्य…
-
दिव्यांग व्यक्तींना वर्क फ्रॉम होमची मुभा,कोरोना उपचारातही प्राधान्य
मुंबई/ प्रतिनिधी - दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक…
-
राष्ट्रीय पोषण बाग उपक्रमाअंतर्गत उमेदच्या महिलानी फुलवली सेंद्रीय शेती
नेशन न्युज मराठी टिम. https://youtu.be/DlGi0_F8RpY बीड - केंद्र सरकारच्या ग्रामीण…
-
उत्कृष्ट काम करणाऱ्या आश्रमशाळांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत बक्षीस योजना
नाशिक प्रतिनिधी- आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी मुली आणि मुलांना शिक्षण…
-
राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला…
-
रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य द्या जिल्हाधिकारी एम.डी.सिंह
प्रतिनिधी. यवतमाळ - कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात…
-
महाराष्ट्राला खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी…
-
महाराष्ट्र दिनी कल्याण परिमंडलातील ५३ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडल…
-
फेम इंडिया’ व ‘एशिया पोस्ट’च्या सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची निवड
प्रतिनिधी. अमरावती - फेम इंडिया’ व ‘एशिया पोस्ट’च्या वतीने देशभर…
-
लातूर, सोलापूर जिल्ह्यांच्या उत्कृष्ट कामांचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लातूर जिल्ह्यातील ‘आरोग्यवर्धिनी’…
-
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर,हॅलो मेडीकल फाऊंडेशन उत्कृष्ट स्वयंसेवी संस्था
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय…
-
सरकार मायबाप लक्ष देईल का? शासकीय पोषण आहारात निघाला सडलेला भलामोठा उंदीर
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - संभाजीनगर धोत्रा ता सिल्लोड…
-
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२१ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - माहिती व जनसंपर्क…
-
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- २०२० साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट…
-
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०२२ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत…