नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – माजी सैनिक पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना २०२३-२४माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ज्यांचे पाल्य शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये इ. १२ वी, डिप्लोमा व पदवी परीक्षेमध्ये किमान ६०% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत व त्यांनी Engineering, B.Tech, MBBS, BDS, B.Ed, BBA, B.Pharm, BCA, MBA व MCA इत्यादी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे, अशा पाल्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
पंतप्रधान शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमाची यादी www.ksb.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहेत. हे अर्ज केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या www.ksb.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून संबंधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज दि.३० नोव्हेंबर २०२३ पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत. अर्ज भरण्यापूर्वी लाभार्थ्यांनी वेबसाईटवर देण्यात आलेल्या Annexure-1,2,3 च्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कॉलेजचे Vice Chancelor /Principal/Vice Principal/Dean/Associate Dean / Registrar / Dy Registrar व बँक मॅनेजर यांची स्वाक्षरी घेवून सोबत ठेवावेत.
सर्व लाभार्थ्यानी ऑनलाईलन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती घेवून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कागदपत्रांच्या पडताळणीकरीता उपस्थित राहावे, तसेच अधिक माहितीसाठी ठाणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे ०२०-२५३४३१७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे ठाणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजळ जाधव यांनी कळविले आहे.