नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – लातूर जिल्ह्यातील ‘आरोग्यवर्धिनी’ आणि सोलापूर जिल्ह्यातील ‘ऑपरेशन परिवर्तन’या नाविन्यपूर्ण उपक्रमांना आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नागरी सेवा दिनी’ ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारा’ ने गौरविण्यात आले. लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
दरवर्षी 21 एप्रिल हा दिवस ‘नागरी सेवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदाचे हे 16 वे वर्ष आहे. आज विज्ञान भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन (DOPT) मंत्रालयांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्री डॉ. जितेंद्र सिंग, प्रधानमंत्री सचिवालयाचे सचिव डॉ. पी. के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गुबा आणि केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाचे सचिव व्ही.श्रीनिवास हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी देशभरातील 16 प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारा’ ने गौरव करण्यात आला.
यामध्ये महाराष्ट्रतील लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि 20 लाख रूपये रोख असे आहे.
पुरस्काराने कामात उत्साह आणि समर्पण भावना वाढेल – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
लातूर जिल्ह्याने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला असून आज प्रधानमंत्री यांच्याहस्ते मिळालेल्या पुरस्काराने संपूर्ण चमूचा उत्साह वाढला असून अधिक समर्पण भावनेने यापुढे सर्व मिळून काम करतील, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली. या योजनेचा लाभ जवळपास 50 लाख लोकांनी घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
असा आहे ‘आरोग्यवर्धिनी’ उपक्रम
लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या पुढाकाराने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामार्फत लातूर जिल्ह्यात विविध सेवा दिल्या जातात. आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून ते विविध आजारांचे निदान, उपचार संदर्भ सेवा इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे. लातूर जिल्ह्यात 233 आरोग्यवर्धिनी केंद्रामधून आरोग्य सेवा सातत्याने दिल्या जात आहेत. यामध्ये गरोदर माता, बालक, किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयीच्या सेवा, संसर्गजन्य व रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांवरील उपचार, आपात्कालीन आरोग्य सेवा, कान, नाक, घसा विषयक, मानसिक आजारांवरील सेवा, तसेच आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योगा, आहार, व्यायाम यासारखे विविध उपक्रम यांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यात आरोग्यवर्धिनींच्या सेवा बळकट करण्यासाठी प्रशासनातर्फे निधीची उपलब्धता करुन देणे, औषधांचा पुरवठा, अद्यावत रुग्णवाहिका यासारख्या उपाययोजना, तसेच कर्करोग निदानासाठीचे संजीवनी अभियान, मातामृत्यू रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेला जीवनरेखा कक्ष, लोकांच्या सोयीसाठी गोवोगावी घेतलेली आरोग्य शिबीर आदी नाविण्यपूर्ण उपक्रम आरोग्यवर्धिनीं अंतर्गत राबविण्यात येतात .
‘ऑपरेशन परिवर्तन’ मुळे स्थानिकांच्या जीवनमान बदलाचा हा सन्मान – पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे
‘ऑपरेशन परिवर्तन’ मुळे स्थानिकांच्या जीवनमान बदलाचा हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. ते म्हणाले, तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा यात सिंहाचा वाटा आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यामध्ये अवैध दारू व्यवसायास आळा बसला व समूळ उच्चाटन झाले. स्थानिक लोकांच्या हाताला स्वंय रोजगाराची साधने उपलब्ध झाल्यामुळे ते अवैद्य दारू विक्रीपासून परावृत्त झाले.
असा आहे ‘ऑपरेशन परिवर्तन’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम
सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने जिल्ह्यामध्ये अवैध दारू व्यवसायावर आळा घालण्याकरीता व त्याचे समूळ उच्चाटनासाठी ‘ऑपरेशन परिवर्तन’ वर्ष 2021-22 मध्ये नावीन्यपूर्ण पद्धतीचा उपक्रम सुरू केला. त्यांच्या या उपक्रमास पोलिस यंत्रणेचे सहकार्य आणि स्थानिकांची साथ यामुळे त्यांचे आयुष्य पालटले. या उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीची 117 ठिकाणे निश्चित करुन त्यातील गांवे जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक अधिकाऱ्यांना दत्तक देण्यात आली. सातत्यपूर्ण कारवाई, समुपदेशन, पुनर्वसन, जागृती या चार टप्प्यावर राबविण्यात आला.
या उपक्रमामध्ये अवैध हातभट्टी व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या या अवैध व्यवसायापासून परावृत्त करुन त्यांना इतर व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करणे, त्यांना आर्थिक मदत मिळवून देणे हे मुख्य ध्येय होते. यादृष्टीने त्यांचे समुपदेशन केले गेले. ज्याचा परिणाम म्हणून 726 व्यक्तींनी स्वत:चा पारंपरिक दारुचा व्यवसाय सोडून देऊन समाजामध्ये ताठ मानेने जगता येण्यासारखे व्यवसाय अंगिकृत केलेले आहेत. त्यांच्या या कामाची दाखल घेत श्री.सरदेशपांडे त्यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
Related Posts
-
महाराष्ट्राला खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी…
-
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ येथे सात दुकाने जळून खाक
सोलापूर/अशोक कांबळे - शुक्रवारी रात्री मोहोळ शहरातील सोलापूर - पुणे…
-
महाराष्ट्राच्या चार बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’ साठी निवड
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्राचे प्रतिभावंत बालक…
-
दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांनी दिली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी -2022 च्या राष्ट्रीय क्रीडा…
-
सोलापूर मध्ये ऑक्सिजनचे ८ टँकर दाखल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला…
-
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रॅलीच्या माध्यमातून जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - डेंग्यू हा डासांमुळे…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझासाठी मासिक पास
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- राष्ट्रीय महामार्गा वापरकर्ता शुल्क…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात…
-
राष्ट्रीय औष्णिक उर्जा आयोगाकडून जैवविविधता धोरण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राष्ट्रीय औष्णिक उर्जा…
-
राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी तीन खेळाडूची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे येथे नुकत्याच झालेल्या…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
सोलापूर जिल्ह्यातील मेथवडे ग्रामपंचायतीवर महिला राज
प्रतिनिधी. सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील…
-
उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट…
-
संचारबंदीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
मराठवाडा मॅरेथॉन लातूर २०२३' ला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर / प्रतिनिधी - मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या…
-
पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच…
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
कर्नाटक सरकारचा निषेध करत एमआयएमचा सोलापूर मध्ये मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/WgIInjbFMLI सोलापूर- कर्नाटक राज्यातील हिजाब वादाचे…
-
नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नांदेड/प्रतिनिधी- मार्च 2023 मध्ये वादळी…
-
कल्याणच्या ऋतुजाने राष्ट्रीय रोलर स्केटींग स्पर्धेत पटकविले कांस्यपदक
कल्याण प्रतिनिधी - रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मोहाली…
-
राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल- मरीनचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि…
-
राष्ट्रीय आपत्तीनिधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्रात आलेल्या पूर…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
महाराष्ट्रातल्या दोन शोर्यवीर बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार
नेशन न्युज मराठी टीम महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने…
-
उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय शुक्रवारी सोलापूर विद्यापीठात
सोलापूर - राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 'उच्च…
-
पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेधार्थ सोलापूर शहर कॉंग्रेसची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/o5SFD1pd0xo सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
-
अमरावतीत कृषी कायद्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन
प्रतिनिधी. अमरावती - सातबारा वाचवण्यासाठी आठ बाराचा बंद यशस्वी करा…
-
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी निस्वार्थ भावनेने अथक…
-
राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची २६ जून अंतिम मुदत
प्रतिनिधी . सांगली - केंद्र शासनामार्फत सन 2017-18 व सन…
-
उत्कृष्ट पत्रकारिता-२०२० प्रवेशिका पाठविण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई प्रतिनिधी- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन,…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१…
-
न्यायाधीन बंदीची देखभाल चांगल्या प्रकारे करा- सोलापूर जिल्हाधिकारी
प्रतिनिधी . सोलापूर - शासकीय तंत्रनिकेतन येथे सोलापूर कारागृहातील न्यायाधीन…
-
राष्ट्रीय माध्यम पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020…
-
भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त सोलापूर येथे पुस्तकांचे वाटप
सोलापूर - संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले असल्याने त्यांना…
-
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नागपूर/प्रतिनिधी - कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर…
-
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधींच्या दुर्मिळ चित्रफितीचे प्रक्षेपण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी -पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट विकास…
-
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२, प्रवेशिकांना ८ मार्चपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत…
-
राष्ट्रीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत हर्ष पोद्दार यांना सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - अखिल भारतीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत…
-
'राष्ट्रीय युवा संसद' स्पर्धेसाठी श्रद्धा शिरोडकरची निवड
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय युवा संसद…
-
गुजरातमधील सिंह नोव्हेंबरअखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - गुजरातमधील सक्करबाग येथील सिंहाची…
-
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकनसाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय महिला आणि…
-
टपाल खात्याकडून राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी- टपाल खात्याकडून चालू आर्थिक वर्षासाठी…