नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – नुकत्याच प्रक्षेपित केलेल्या EOS-06 उपग्रहाची छायाचित्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केली आहेत. अंतराळ तंत्रज्ञानाच्या जगातील या प्रगतीमुळे चक्रीवादळांचा योग्य अंदाज येण्यास मदत होईल आणि किनारपट्टी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे ;
“तुम्ही नुकत्याच लाँच केलेल्या EOS-06 उपग्रहाद्वारे आलेली अवर्णनीय छायाचित्रे पाहिली आहेत का? गुजरातची काही सुंदर छायाचित्रे शेअर करत आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या जगातील या प्रगतीमुळे आपल्याला चक्रीवादळांचा अधिक योग्य अंदाज लावण्यास आणि आपल्या किनारपट्टीच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात मदत होईल.”
Related Posts