नेशन न्यूज मराठी टिम.
मुंबई/प्रतिनिधी – आज स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम आणि उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाच्या वतीने भव्य तिरंगा गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होती मोठ्या संख्येने कार्यकर्ता व पदाधिकारी या यात्रेत सामील झाले होते ही यात्रा गोरेगाव पश्चिम येथून सुरू झाली असून अंधेरी पश्चिम येथे समाप्त झाली.
या यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड देखील सामील झाल्या होत्या. दरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिला की निवडणुकीच्या तयारीला लागा आणि आणि जर भारताला हुकूमशाही पासून वाचवायचा असेल तर 15 ऑगस्ट 2024 ला लाल किल्ल्यावर इंडिया अलायन्समध्ये स्वतंत्र दिन साजरा झाला पाहिजे तसंच आज लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे भाषण झाले ते देशाचे पंतप्रधान म्हणून नाही तर आरएसएसचे प्रचारक म्हणून त्यांनी भाषण केले.असा टोला भाजप सरकारला यावेळी लगावला.