महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी राजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात भव्य सभा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

पुणे/प्रतिनिधी – सतत दौऱ्यावर असणारे पंतप्रधान अशी ज्यांची लोकांमध्ये ओळख आहे, ते म्हणजे भारताचे पंतरप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान आज पुण्यात येणार आहेत. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नाही तर महायुतीच्या प्रचारासाठी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या रेसकोर्स येथे येणार आहेत. मोदी आज काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य असणार आहे. नरेंद्र मोदींच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. या सभेत राज्यातील अनेक मंत्री, आमदार व माजी खासदार उपस्थित राहणार आहेत. तसेच, बारामती, पुणे, शिरूर, मावळ लोकसभा मतदार संघामधून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते येणार आहेत.

या सभेसाठी शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. सर्व प्रकारची जड वाहने, ट्रेलर्स, कंटेनर्स, ट्रक्स, मिक्सर, डंपर, बल्कर व अन्य माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. पुणे-अहमदनगर, पिंपरी चिंचवड़ येथून येणाऱ्या वाहनांसाठी सर्किट हाऊस ते मोरओढ़ा, वॉर मेमोरीयल ते घोरपडी गेट, आर्मी पब्लीक स्कुल घोरपडी गाव येथे व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे-सातारा, सिंहगड व स्वारगेट परिसरामधून येणाऱ्या वाहनांकरीता बेऊर रोड जंक्शन, कोयाजी रोड अंतर्गत रस्ते, तिनतोफा चौक, बीशप स्कुल परिसर याठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या बसची व्यवस्था रामटेकड़ी उड्डाणपुलावरुन गेल्यानंतर हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×