नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – बृहन्मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या आणि मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास वेगवान करणाऱ्या मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ (टप्पा-२) या मार्गिकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते.
दरम्यान मुंबई-१ कार्ड आणि मेट्रो अॅप एनसीएमसी कार्डचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी गुंदवली मेट्रो स्थानक येथे मेट्रो प्रकल्पाच्या छायचित्रांचे प्रदर्शन आणि थ्रीडी आराखड्याची पाहणी केली. आणि मेट्रो स्टेशनवर स्वतः मेट्रोचे तिकीट घेऊन गुंदवली मेट्रो स्टेशन ते मोगरा मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास केला.
सुलभ वाहतुकीसाठी दोन स्मार्ट उपक्रम “मुंबई १” मोबाईल ॲप आणि एनसीएमसी
मुंबई १” मोबाईल अॅप : या ॲपमध्ये प्रवाशांसाठी मेट्रो संबधित सर्व आवश्यक माहिती देण्यात आली आहे.तसेच मेट्रो स्थानकावर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी जे दरवाजे आहेत तिथे असलेल्या ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन पॉइंटवरून प्रवाशांना प्रवेश करता यावा यासाठी मोबाईल फोनवर हा ॲप एक क्यूआर कोड तयार करतो.
एनसीएमसी कार्ड
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) हे सुरूवातीला एमएमआरडीव्दारे चालवण्यात येणा-या मेट्रो कार्डवरती वापरल जाणार आहे.नंतर हळूहळू ही सुविधा लोकल ट्रेन्स आणि बसेससह सार्वजनिक वाहतूकीच्या इतर पर्यायांसाठी विस्तारीत करण्यात येणार आहे.डिजिटल व्यवहारासाठी या कार्डमध्ये १०० रूपये ते दोन हजार रूपयापर्यंत या कार्डला रिचार्ज करता येणार आहे.
मुंबई मेट्रो २ अ आणि ७ ची वैशिष्टयै
वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.पर्यावरणस्नेही मेट्रो नेटवर्क मुंबईकरांना नक्कीच दिलासा देणारे ठरणार आहे
मेट्रो २ अ दहिसर पूर्व ते डीएन. नगर. ६४१० कोटी रूपयांचे १८.६ किमी मार्गिका असून १७ स्थानकांचा यामध्ये समावेश आहे.
मेट्रो मार्गिका ७ (अंधेरी पूर्व- दहिसर पूर्व) रूपये ६२०८ कोटी खर्चासह १६.५ कि.मी मार्गिका असून १३ स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांची किंमत जवळपास १२ हजार ६१८ कोटी आहे.
मेट्रो मार्ग २अ आणि ७ च्या टप्पा २ मधील स्थानके
मेट्रो लाईन-२अ- टप्पा-२
वळनई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी (पश्चिम).
मेट्रो मार्ग ७- टप्पा- २
गोरेगाव (पूर्व), जोगेश्वरी (पूर्व), मोगरा, गुंदवली.
वरील दोन्ही मेट्रो मार्गांसाठी दहिसर पूर्व हे संयुक्त स्थानक आहे.
मेट्रो मार्ग २अ- टप्पा- १
दहिसर (पूर्व), आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर- I.C. कॉलनी, एकसर, बोरिवली (पश्चिम), पहाडीएकसर, कांदिवली (पश्चिम), डहाणूकरवाडी.
मेट्रो मार्ग ७- टप्पा- १
दहिसर (पूर्व), ओवरीपाडा, राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे या स्थानकांचा समावेश आहे.
एकात्मिक मेट्रो मार्गिका
पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने एकमेव सर्वसमावेशक मुंबई मेट्रो नेटवर्कच स्वप्न बघितल होते ते प्रत्यक्षात उतरल्यामुळे गर्दी आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.पर्यावरणस्नेही मेट्रो नेटवर्क मुंबईकराना नक्कीच दिलासा देणारे ठरणार आहे
यामध्ये मुंबई मेट्रो मार्ग २अ (दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो मार्ग ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली, म्हणजेच अंधेरी पूर्व) आता पूर्णपणे कार्यान्वित झाली असून मेट्रो मार्ग १ सह एकात्मिक केली आहे. दहिसर किंवा गोरेगाव ते घाटकोपर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेची बचत होणार आहे
रोलिंग स्टॉक
मेट्रो २ अ आणि मेट्रो लाईन 7 अनअटेण्डेड ट्रेन ऑपरेशनसाठी (युटीओ) विनाचालक ट्रेन विकसित करण्यात आल्या आहेत. सहा डबे असलेल्या ट्रेनची प्रवासी क्षमता २३०८ इतकी आहे. या ट्रेनची डिझाइन केलेला ताशी वेग ९० कि.मी. असून क्रियात्मक वेग ताशी ८० कि.मी. आहे. तर सरासरी वेग ताशी ३५ किमी आहे.स्थानकाची माहिती देण्यासाठी ऑटोमॅटिक पेसेंजर अनाऊन्समेण्ट यंत्रणा बसवण्यात आली आहे.तसेच प्रत्येक दरवाज्यावर स्टेशनची माहिती देणारे डिजिटल रूटमॅपही आहेत.
सुरक्षा यंत्रणा
सर्व स्थानकावर बॅगेज स्कॅनिंग मशीन, हॅण्डहेल्ड मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहे.
रूफ टॉप सोलार सिस्टिम
मेट्रो स्थानकावर रूफ टॉप सोलर सिस्टिमने सुसज्ज करण्यात येणार आहेत. ती रेस्को मॉडेलवर आधारित योजना आहे. स्थानक, डेपो आणि मागाठणे आरएसएस बिल्डिंगच्या छतावरची उपलब्ध जागा सोलार सिस्टिम बसवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. मेट्रो मार्ग ७ वरची स्थानक आणि संबंधित इमारतींवर बसवण्यात येणाऱ्या सोलार सिस्टिमची एकूण अंदाजित वीज निर्मिती क्षमता ३.० मेगावॅट – पीक एवढी असेल. सोलार सिस्टिमद्वारे निर्माण झालेली वीज स्थानकाच्या सहाय्यक भारांवर स्थानिक पातळीवर वापरली जाईल.
दिव्यांगासाठी सुविधा
दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन स्थानकांवर व्हीलचेअर, ब्रेलसह लिफ्ट बटणे आणि प्लॅटफॉर्मवर टॅक्टाइल टाइल्स आहेत जे दृष्टिहीन लोकांसाठी दिशादर्शक म्हणून काम करतील.
सार्वजनिक माहिती प्रणाली
प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व स्थानकांवर सार्वजनिक घोषणा आणि माहिती प्रदर्शित करणारी यंत्रणा देण्यात आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, सिग्नलींग, एस्कलेटर्स या सुविधाही करण्यात आल्या आहेत.
मेट्रो मार्ग ७ वरच्या स्थानकांना आयजीबीसीच ‘प्लॅटिनम ‘ मानांकन
पायाभूत सुविधांचा विकास करताना पर्यावरण संवर्धनाला महत्व देण्यात आले आहे.मेट्रो मार्ग ७ वरच्या १० मेट्रो स्थानकांना ‘आयजीबीसी’ तर्फे ‘प्लॅटिनम ‘ दर्जाचे मानांकन देण्यात आलं आहे. जोगेश्वरी (पूर्व), आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान आणि ओवारीपाडा अशी या स्थानकाची नाव आहेत. आयजीबीसीच्या ‘ग्रीन मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टिम रेटिंग प्रोग्राम’ नुसार स्थानकाच मूल्यांकन करण्यात आले आहे. आयजीबीसीच्या मानांकन अहवालामध्ये मेट्रो मार्ग ७ साठीची पर्यावरण व्यवस्थापन योजना (ईएमपी)ची अंमलबजावणी करण्यात आली आहे.आयएसओ १४००१ च्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केले आहे.
प्रवाशांची सुविधा व सुरक्षा
प्लॅटफॉर्म स्क्रिन डोअर्स (पीएसडी) ही मोटरव्दारे उघड बंद होणाऱ्या सरकत्या दरवाजांची अत्याधुनिक प्रणाली आहे. मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्म्सचं संरक्षण करण्यासाठी आणि मेट्रोमध्ये प्रवाशांच्या होणा-या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही प्रणाली फार उपयुक्त ठरणार आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि दिव्यांग व्यक्तींनाही मेट्रोत सहज येता यावे म्हणून असे सरकते दरवाजे फार उपुयक्त आहेत.
Related Posts
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण…
-
नागपूर मेट्रोचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था…
-
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - पुणे शहर आध्यात्मिक, सांस्कृतिक…
-
१३ विविध महामार्ग प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
सोलापूर/प्रतिनिधी - संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गाची लांबी…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, नवी दिल्लीत प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
महाराष्ट्रातील तीन पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पोलीस सेवेत अदम्य…
-
पहलवान साहेब जीवन चरित्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्कसपटू मल्ल…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘वन भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - ‘वन भवन’ या वन…
-
कल्याणात १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डॉ. श्रीकांत शिंदे…
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र…
-
‘लोकराज्य’च्या महापर्यटन विशेषांकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या…
-
‘सर्वांसाठी पाणी’ धोरणाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिका देशात सर्वोत्तम…
-
आरपीएफच्या कर्मचाऱ्यांचा रेल्वेमंत्री यांच्या हस्ते सत्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - रेल्वे संरक्षण दलाचा…
-
युवक काँग्रेसच्या वतीने नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - देशामध्ये बेरोजगारीची…
-
राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला…
-
माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांचे अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी - देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री, भारतरत्न दिवंगत इंदिरा गांधी…
-
सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वितरण
नवी दिल्ली/प्रतिनिधी - सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती राम नाथ…
-
ई-ऊसतोड कल्याण’ ॲपचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण
बीड/प्रतिनीधी - ऊसतोड कामगार ऊसतोडणीसाठी कारखान्यांवर जाण्यासाठी निघण्यापूर्वीच ऊसतोड कामगारांची…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बँकांच्या ‘सीएसआर’ निधीतील कामांचे लोकार्पण
प्रतिनिधी. पुणे - विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या…
-
बीबीएनजीच्या उद्यम कौस्तुभ पुरस्कारांचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे – खुल्या प्रवर्गातील तरुणांना शैक्षणिक,…
-
नरेंद्र मोदी हा लोकशाहीचा नाही, तर ठोकशाहीचा पंतप्रधान - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. सांगली/प्रतिनिधी - नरेंद्र मोदी हा…
-
कल्याण डोंबिवलीमधील ४४५ कोटींच्या रस्त्यांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील तसेच शहरातील…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
पंढरपूर/ प्रतिनिधी - पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे. भक्तिरसात,…
-
पुण्यात राज्यपालांच्या हस्ते दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - साधू वासवानी…
-
मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते क्रांती गाथा - गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीजचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई - भारतीय क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा…
-
नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आले तर २०२६ला देश कर्जात बुडेल - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - वंचित बहुजन…
-
१३ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी रिव्हर क्रुझला दाखवणार हिरवा झेंडा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझचा शुभारंभ वाराणसी येथे 13 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एमव्ही गंगा विलास याभारतात रिव्हर क्रूझ पर्यटनाचे नवे युग सुरु करेल, असे बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले. ही लक्झरी क्रूझ भारतातील 5 राज्ये आणि बांगलादेश मधील 27 नद्यांमधून 3,200 किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास करेल, असे त्यांनी सांगितले. या सेवेच्या प्रारंभानंतर रिव्हर क्रूझची आजवर वापरात न आलेली प्रचंड क्षमता खुली होणार आहे, असेही सोनोवाल म्हणाले. देशातील सर्वोत्कृष्ट सेवा जगासमोर आणण्यासाठी एमव्ही गंगा विलास क्रूझची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या 51 दिवसांच्या प्रवास नियोजनात ही रिव्हर क्रुझ जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदीचे घाट यासोबतच बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी यासारख्या प्रमुख शहरांसह 50 पर्यटन स्थळांना भेटी देणार आहे. एमव्ही गंगा विलास क्रूझ 62 मीटर लांब,12 मीटर रुंद आणि 1.4 मीटरच्या ड्राफ्टसह आरामदायी प्रवास करते. यात तीन डेक आणि 36 पर्यटक क्षमतेचे 18 सुइट्स आहेत. या सुइट्समध्ये पर्यटकांना एक संस्मरणीय आणि विलासी अनुभव देणाऱ्या सर्व सुविधा आहे एमव्ही गंगा विलासच्या पहिल्या प्रवासात स्वित्झर्लंडमधील 32 पर्यटक वाराणसी ते दिब्रुगड प्रवासाचा आनंद लुटतील. दिब्रुगडमध्ये एमव्ही गंगा विलासच्या आगमनाची अपेक्षित तारीख 1 मार्च 2023 आहे. भारतातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी थांबणार असून त्यासोबतच भारताच्या समृद्ध वारश्याचे दर्शन होईल अशा पद्धतीने एमव्ही गंगा विलासच्या प्रवासाची रूपरेषा आखण्यात आली आहे. ही क्रुझ वाराणसीतील प्रसिद्ध "गंगा आरती" पासून ते बौद्ध धर्मासाठी अत्यंत आदराचे ठिकाण असलेल्या सारनाथचे दर्शन घडवेल. क्रुझ आपल्या प्रवासात तांत्रिक विधीसाठी प्रसिद्ध असलेल्या मायॉन्ग आणि मजुली या सर्वात मोठ्या नदी बेटाला भेट देईल. सोबतच आसाममधील वैष्णव पंथीयांचे सांस्कृतिक केंद्रालाही भेट दिली जाईल. बिहार स्कूल ऑफ योगा आणि विक्रमशिला विद्यापीठाला देखील प्रवासी भेट देतील. या भेटीमुळे प्रवाशांना भारताचा अध्यात्म आणि ज्ञानाचा समृद्ध वारसा जवळून पाहता येईल. समुद्रपर्यटन आणि रॉयल बंगाल टायगर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या बंगालच्या उपसागरातील सुंदरबनच्या जैवविविधतेने नटलेल्या समृद्ध जागतिक वारसा स्थळांवरून तसेच एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातूनही ही क्रुझ प्रवास करेल. देशात रिव्हर क्रूझ पर्यटन विकसित करण्याची गरज सोनोवाल यांनी अधोरेखित केली. या क्षेत्राच्या पर्यटन विकासामुळे दुर्गम भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले.
-
नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - पक्ष वाढवायचा की…
-
महाराष्ट्र पर्यटनाचे सुधारित संकेतस्थळ व महाराष्ट्र टुरिझम मोबाईल ॲपचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे.…
-
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथील विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते एमटीडीसीच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले…
-
मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु
प्रतिनिधी. मुंबई - राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक…
-
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी. मुंबई - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील…
-
डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांच्या पुस्तिकेचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. गडहिंग्लज/प्रतिनिधी - ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ…
-
राज्यपालांच्या हस्ते ‘विज्ञान विश्व’चे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषेतून विज्ञान प्रसाराच्या हेतूने सुरु केलेल्या ‘विज्ञान विश्व’…
-
डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व अतिरिक्त मेट्रो सेवेचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी…
-
दैवत विश्रामगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
प्रतिनिधी.अलिबाग - स्थानिक लोकाधिकार समितीने विविध उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ…
-
क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त…
-
भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो कोच मुंबईत दाखल
प्रतिनिधी. मुंबई - भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो डबा मुंबईत दाखल झाला…