नेशन न्यूज मराठी टिम.
नागपूर/प्रतिनिधी – नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची तायारी अंतिम टप्प्यात आली आहे. यामध्ये ३६१ गटग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या साठीची संपुर्ण तयारी झाली आहे. यामध्ये मतपेट्या प्रशिक्षित कर्मचारी सर्व बाबी तपासून पाहत आहेत. या मधील EVM मशिन तपासणी, मतदान यादी तपासणी आणि बाकी सर्व प्रक्रिया पूर्ण करून सर्व मतदान पेट्या पोलीस बंदोबस्तात आपापल्या मतदान केंद्रावर जाणार आहेत.
यानंतर उद्या सकाळी 7.30 पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. व सायंकाळी 5.30 ला संपणार आहे. यानंतर परवा या सर्व ग्रामपंचायतीतील निवडणुकीचा निकाल लागणार आहे.अशी महिती प्रताप वाघमारे, तहसीलदार नागपूर यांनी दिली आहे.