नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन तथा जि.शि.प्र.सं ठाणे व कल्याण डोंबिवली मनपा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग कल्याण अंतर्गत येणाऱ्या मनपाच्या सर्व ५९ शाळां मध्ये प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनात शाळा पूर्वतयारी मेळावा क्र २ दि. २३ जून २०२३ रोजी साजरा करण्यात आला.
या मेळाव्यात सीआरसी प्रमुख, मुख्याध्यापक,, लोकप्रतिनिधी, शिक्षक, बालवाडी ताई, पालक, माता पालक, स्वयंसेवक यांचा सक्रीय सहभाग घेण्यात आला. इयत्ता १ ली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे विविध कौशल्य विकसित व्हावेत, आत्मविश्वासासह शाळेत पहीले पाऊल पडावे या दृष्टीकोनातून सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या विविध कृती पूर्ण करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले. त्यात शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, भाषिक विकास विकसित व्हावे या उद्देशाने स्टॉल लावण्यात आले. सर्व स्टॉल वर विद्यार्थ्यांनी कृतियुक्त सहभाग घेतला. शाळापूर्व तयारी मनपा समन्वयक म्हणून विषयतज्ञ राजाभाऊ शेप यांनी कामकाज सांभाळले. मेळावा क्र २ नंतर सर्व शिक्षक, पालक व बालकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.