नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – ईद उल अजहा अर्थात ‘बकरी ईद’ निमित्त कल्याणात दुर्गाडी किल्ल्यावरील ईदगाह येथे हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. यावेळी राष्ट्रीय शांतता व अखंडता कायम राहावी, अशी प्रार्थना मुस्लिम बांधवांनी केली. त्यानंतर गळाभेट घेऊन लहान-मोठय़ांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. तर दुर्गाडी किल्ल्यासमोरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने या खड्ड्यांमध्ये बसूनच मुस्लीम बांधवाना नमाज पठण करावे लागले. यामुळे मुस्लीम बांधवांमध्ये नाराजी पसरली आहे.
दरम्यान गेले ८ महिने प्रशासनाशी संबंधित विभागातील नागरिक तक्रार करत होते. सिमेंट काँक्रीटचा रोड होणार हे गाजर दाखवून अधिकारी दुर्लक्ष करत राहिले. आज ईद ची नमाज ही खड्यात अदा केली. टेंडर सम्राट मुजोर अधिकारी यांना याच खड्यात लोळवले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवराज्य मुस्लिम फ्रंटचे सरचिटणीस इरफान शेख यांनी दिली.