कल्याण प्रतिनिधी– काल रात्रीच्या सुमारास वाहतूक पोलीसांची कल्याण पाश्चिम परिसरात ड्रिंक एन्ड ड्राइव्ह ची कारवाई सुरू होती .याच दरम्यान एका मद्यपी टेम्पो चालकावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली .या कारवाई दरम्यान दारूच्या नशेत झिंगत असलेल्या या टेम्पो चालकाने चक्क वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश जाधव यांची कॉलर धरत त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली .पोलिसांनी तत्काळ या मद्यधुंद चालकाला ताब्यात घेत कल्याण वाहतूक पोलीस कार्यालयात आणले .या कार्यलयात देखील त्याने एकच धिंगाणा घालत वाहतूक पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली व पोलिसांच्या अंगावर धावून गेला .हा सर्व प्रकार व्हिडियोत कैद झाला असून या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात मद्यपी वाहनचालक गोकुळ पदघन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केलीय.
Related Posts