नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – “India vs भारत” वादावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले असून संविधानाच्या पहिल्या कलमाशी खेळून भाजप-आरएसएसने #IndiaAliance ला मुर्खात काढले असल्याची टीका त्यांनी केली आहे.
राष्ट्रपती यांनी पाठवलेल्या निमंत्रणावरून देशाच्या नावसंदर्भात नावाचं वाद सुरू झाल्याचे दिसून येत. निमंत्रणावर देशाचं नाव India ऐवजी भारत लिहिल्याने #IndiaAliance च्या नेत्यांनी विविध विधाने करून हे सर्व त्यांच्या आघाडीला घाबरून केले जात असल्याची टीका केली होती. या वादावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्मिक भाष्य केले आहे.
ट्विट मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणतात की, “संविधानाच्या पहिल्या कलमाशी खेळून भाजप-आरएसएसने #IndiaAliance ला मुर्खात काढले आहे.
घटनेच्या कलम 1 मध्ये असे नमूद केले आहे की India, म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. #INDIA आणि #BHARAT दोन्ही या कलमात येतात.
प्रथमतः India का वापरला गेला हे सांगण्याऐवजी ते भाजप-आरएसएसच्या हेतूवर हल्ला करत आहेत.
भाजप-आरएसएसला हेच हवे आहे आणि इथेच INDIA हरला आहे, कारण हा भाजप-आरएसएसचाच अजेंडा आहे. तो अजेंडा म्हणजे या प्रकारच्या परिस्थितींवर मात करण्यासाठी INDIA आघाडीत रणनीतीचा अभाव तसेच कल्पकता आणि ज्ञानाची दिवाळखोरी आहे हे मतदारांना दाखवणे.” असे ट्विट मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.